राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वातंत्र्यदिन साजरा स्वातंत्र्यसैनिक सदाशिव कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गुप्ते मंगल कार्यालय, नारायण पेठ येथे स्वातंत्र्यसैनिक श्री. सदाशिव गोविंद ऊर्फ नाना कुलकर्णी यांच्या शुभहस्ते १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त झेंडावंदन करण्यात आले. अध्यक्षस्थानी श्री. दीपक मानकर होते.
यावेळी बोलताना स्वातंत्र्यसैनिक श्री. नाना कुलकर्णी म्हणाले, “स्वातंत्र्यकाळात २५० जवानांच्या फौजेने केलेल्या थरारक गोष्टींचे कथन व देशभक्तीपर कवितांचे वाचन केले. ते ऐकताना सर्वांच्या अंगावर अक्षरशः अंगावर काटा आला.
शहराध्यक्ष दीपक मानकर म्हणाले, “स्वातंत्र्यसैनिकानी दिलेल्या आत्मत्यागासाठी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्या स्वातंत्र्याचे सुराज्य करायचे काम कार्यकर्त्यांनी केले पाहिजे. स्वातंत्र्य चळवळीत त्यावेळी स्वातंत्र्यसैनिकांचे जहाल व मवाळ असे दोन गट पडले होते. त्या दोन्ही गटांचे एकच उद्दिष्ट होते. ह्या देशाला स्वातंत्र्य मिळावे. ब्रिटिशांनी लहान मुलगा नारायण दाभाडे यांच्यावर गोळ्या झाडल्या. हे बलिदान न विसरता कायम स्मरणात ठेवले पाहिजे. पक्षाच्या वतीने आगामी काळात दरवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबातील व्यक्तींचा योग्य तो सन्मान केला जाईल व त्यांना आवश्यक त्या गोष्टींची पूर्तता केली जाईल.
सदरप्रसंगी कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, आप्पा रेणुसे, श्रीमती शशिकला कुंभार, बाळासाहेब बोडके, श्रीमती वासंती काकडे, नाना आबनावे, हर्षवर्धन मानकर, युवती अध्यक्षा कु. पूजा झोळे, कार्याध्यक्ष कु. मयुरी तोडकर, कु. लावण्या शिंदे, संतोष नांगरे, महेश शिंदे, शांतीलाल मिसाळ, शुभम माताळे, बाळासाहेब आहेर, समीर शेख, शिवाजी पाडळे, बाळासाहेब बराटे, अशोक जाधव, दयानंद इरकल, योगेश वराडे, पुष्पा गाडे, मिलिंद वालवडकर, विपुल म्हैसूरकर, संतोष बेंद्रे, माणिक दुधाने, गोरख भिकुले, दत्ता सागरे,नईम बाबा शेख, निलेश शिंदे, विजय बाबर, रामदास गाडे, पंडित जगताप, जयदेव इसवे, विक्रम मोरे, शालिनी जगताप,पुरुषोत्तम नांगरे, नवनाथ खिलारे, रुपेश संत, तरनुम जमादार, कु.सोनू थोरवे, शितल जौजाळ, बायडाबाई पाटील, मीनाक्षी आहिरे, किरण आबनावे, जयश्री पाटील, संगीता घुले, श्वेता मिस्त्री, अरुण गवळे, राजेंद्र घोलप, विजया भोसले, राहुल पायगुडे, सुरेश जौजाळ, नरेश जाधव,राजा सावंत, राहुल तांबे, अन्वर शेख, शशिकांत जगताप,गजानन लोंढे, शंकर सहाणे, संजय चव्हाण आदी उपस्थित होते.