17/07/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुणे शहर पदाधिकारी व कार्यकारणीची लवकरच घोषणा

Share Post

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुणे शहर पदाधिकारी आणि कार्यकारणीची घोषणा लवकरच करण्यात येत असून या संदर्भात उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली. राष्ट्रवादीची पुणे शहरात असलेली ताकद आणखी वाढवण्याच्या दृष्टीने नव्या कार्यकारिणीत सहकाऱ्यांना स्थान देण्यात येणार असून याबाबत मा. दादांशी चर्चा करुनच निर्णय घेण्यात येणार आहे.

प्रदेशाध्यक्ष मा.श्री. सुनीलजी तटकरे, मंत्री मा.श्री. दिलीप वळसे-पाटील साहेब, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा मा. रुपालीताई चाकणकर यांची यावेळी उपस्थिती होती. शिवाय माझ्यासमवेत यावेळी माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, मा. सभागृह नेते श्री. सुभाष जगताप, श्री. अप्पा रेणुसे, मा. विरोधीपक्ष नेते दत्ताभाऊ सागरे, शहर कार्याध्यक्ष श्री. प्रदीप देशमुख उपस्थित होते.