29/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

रायझिंग पुणे संघ ब्रदरहुड प्रीमियर लीगचा विजेता ठरला

Share Post

ब्रदरहुड फाऊंडेशन, पुणे तर्फे आयोजित ब्रदरहुड प्रीमियर लीग 2023-2024 क्रिकेट स्पर्धेत
रायझिंग पुणे संघाने जेजे जवान संघाचा पराभव करून ब्रदरहुड प्रीमियर लीग चषक जिंकला .

पुण्याच्या ब्रदरहुड फाऊंडेशनला यंदा २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या 10 वर्षांपासून ब्रदरहुड प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. अशी माहिती अध्यक्ष पवनकुमार जैन व सरचिटणीस नरेंद्र गोयल यांनी दिली.

संस्थापक अध्यक्ष जयप्रकाश गोयल, अध्यक्ष पवन कुमार जैन, नरेंद्र गोयल, राकेश अग्रवाल, नरेंद्र मित्तल आणि महिला संघांना गीता गोयल, प्रथम महिला कविता जैन, कांतादेवी गोयल आणि रुची गोयल यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी सल्लागार विकास गुप्ता, पवन बन्सल, संजय (प्रिन्स) अग्रवाल उपस्थित होते.

अग्रवाल समाजातील सर्व वयोगटातील लोकांना संघटित करण्याच्या मुख्य उद्देशाने ही क्रिकेट स्पर्धा सुरू केल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष पवनकुमार जैन व सरचिटणीस नरेंद्र गोयल यांनी दिली. श्री. जैन यांनी सांगितले की अध्यक्ष या नात्याने त्यांच्या पत्नी कविता जैन यांना संस्थेतील प्रथम महिला तर रविकिरण जी यांच्या पत्नी स्वाती अग्रवाल, कोषाध्यक्ष संजय बी अग्रवाल योगिता अग्रवाल, सरचिटणीस नरेंद्र गोयल, रुची गोयल.
त्यांनी सांगितले की या बीपीएल स्पर्धेचे अध्यक्ष नरेंद्र मित्तल आणि रीना मित्तल आहेत. तर उपाध्यक्ष राकेश अग्रवाल आणि रेखा अग्रवाल आहेत. त्यांच्या समितीने या चार दिवसीय बीपीएल म्हणजेच ब्रदरहुड प्रीमियर लीग २०२३-२०२४ चे आयोजन अतिशय शानदारपणे केले. 4 जानेवारी ते 7 जानेवारी या कालावधीत सलग खेळलेल्या या ‘डे-नाईट मॅच’चे नियोजन अतिशय सुरळीतपणे करण्यात आले.

या ब्रदरहुड प्रीमियर लीग 2023-2024 क्रिकेट स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना नरेंद्र गोयल म्हणाले की, या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी झाले होते, त्यापैकी 4 महिला संघ होते.

संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या महाराष्ट्र ब्लाइंडक्रिकेटअसोसिएशनचै दृष्टीहीन क्रिकेटपटूंनी यावेळी क्रिकेटचा सामना दिलीप शेळवंते यांच्या मार्गदर्शनाखाली
खेळला .
महिलांच्या दिवास गटात चमडिया क्वीन संघाने सरस सुपर क्वीन संघाचा पराभव करत शानदार कामगिरी करत दिवा चषकावर कब्जा केला.

त्याचप्रमाणे Friends 11 ने ISKY Royal चा पराभव करून Legend Cup जिंकला.

संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या अरविंद अग्रवालला सामनावीर, मालिकावीर आणि सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक या किताबाने गौरविण्यात आले, तर जितेंद्र अग्रवालला ऑल राउंडर प्लेअर आणि रनर अप ट्रॉफीचा मान मिळाला.

या ब्रदरहुड प्रीमियर लीग 2023-2024 क्रिकेट स्पर्धेचा समारोप लिजेंड स्पोर्ट्स क्लब, मुंढवा येथे झाला. ही स्पर्धा पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने जमले होते, त्यामुळे खेळाडूंचा उत्साह द्विगुणित झाला होता.