राजेशाही थाळी हॉटेल पुणेकरांच्या सेवेत रुजू
धायरी – सिंहगड रोड आणि पुण्यातील खवय्यांसाठी राजेशाही थाळी हॉटेल सुरू झाले असून नुकतेच या हॉटेलचे दिमाखात उद्घाटन झाले. खास नॉनव्हेजसाठी तसेच व्हेजसाठी या हॉटेलची खासियत आहे. राजेशाही थाळी हॉटेल हे लेन नंबर ३१अ, उंबऱ्या गणपती चौक जवळ, पोकळे शाळे समोर, धायरी मुख्य रोड, पुणे या ठिकाणी सुरू आहे. सिहंगड रोड परिसरात खवय्यांसाठी ९ वर्षांपासून राजेशाही हॉटेल सुरू आहे. पुन्हा नव्या उमेदीने हे हॉटेल विविध पदार्थ, पदार्थांचे विविध प्रकार सुरू केले आहेत. या हॉटेलचे मालक निलेश दमिष्टे, रमाकांत राणे आणि युवराज कसबे असे आहेत.
उद्घाटन प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा दमिस्थे,
स्वामींनी महिला मंचच्या अध्यक्षा
वैशाली तावरे, रस्साकिंग मसालेच्या संचालिका राणी कसबे, वैशाली दमिस्ते, ऋजुता राणे, प्राजक्ता दमिस्ते, डॉ. ऋतुजा कसबे, डॉ. आर्या तावरे
विशेष उपस्थिती अंकुशराव पोकळे, आयर्न मॅन प्रसाद शिंदे, उद्योजक राजेंद्र दुकानें, दैनिक वैभवचे कार्यकारी संपादक सिकंदर सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.
राजेशाही स्पेशल मटण थाळी, स्पेशल मटण थाळी, तेल चटका मटण (काळ्यामसाल्यातील), वजडी फ्राय मसाला, खिमा फ्राय मसाला तसेच राजेशाही स्पेशल चिकन थाळी, स्पेशल चिकन थाळी गावरान चिकन थाळी, तेल चटका चिकन (काळ्यामसाल्यातील) त्याच बरोबर फिशमध्ये खेकडा स्पेशल थाळी, बांगडा थाळी, सुरमई थाळी, पापलेट थाळी, कोळंबी फ्राय, सुरमई व पापलेट फ्राय अशा विविध डिश ग्राहकांना मिळणार आहेत.
