‘राजसा बाय ईशान कलेक्शन’ च्या नवीन दालनाचे प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक अरबाज खान आणि अभिनेते सोहेल खान यांच्या हस्ते होणार उद्घाटन
पुण्याच्या वैभवशाली सांस्कृतिक वारश्यात भर घालणाऱ्या ‘राजसा बाय ईशान कलेक्शन’ या भव्य वस्त्र दालनाचा शुभारंभ प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक अरबाज खान आणि अभिनेते सोहेल खान यांच्या हस्ते येत्या 8 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे. तसेच याप्रसंगी सामाजिक कार्यासाठी एका अनोख्या फॅशन शोचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ‘राजसा बाय ईशान कलेक्शन’चे मालक नेहा घोलप पाटील,अंकुश पाटील यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अंकुश पाटील म्हणाले की, ‘राजसा बाय ईशान कलेक्शन’ ची पहिली शाखा सिंहगड रोड येथे सुरू आहे. आता आम्ही कोरेगाव पार्क येथे नवीन दालन सुरू करत आहोत. आमच्याकडे मेन्स एथानिक कपड्यांची वैविध्यपूर्ण रेंज ग्राहकांना उपलब्ध असणार आहे. लग्न, साखरपुडा, पार्टी आणि अन्य सण – समारंभासाठी आम्ही एक्सक्लूझीव्ह कस्टमाईज्ड प्रकारात वस्त्र उपलब्ध करून देत आहोत. आमच्याकडे स्वतः चे कारागीर आहेत, त्यामुळे ग्राहकांना हव्या त्या डिझाईन मध्ये त्यांच्या पसंतीनुसार वाजवी दरात आम्ही कपडे उपलब्ध करून देऊ शकतो. तसेच महिलांसाठीही या ठिकाणी एक प्रीमियम दर्जाचा विभाग असणार आहे.
पुढे बोलताना अंकुश पाटील म्हणाले की, ‘राजसा बाय ईशान कलेक्शन’ च्या नवीन शाखेच्या उद्घाटनानिमित्त एक दिव्यांग व्यक्ती अभिनेते अरबाज खान आणि अभिनेते सोहेल खान यांच्या उपस्थितीत रॅम्पवॉक करणार आहे.