29/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

राजगडावर दर्शन अभ्यास आणि स्वच्छता मोहीम

Share Post

जगड म्हणजे गडांचा राजा राजियांचा गड.हा एकमेव गड असा आहे ज्यावर अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यातील २४ ते २५ वर्ष व्यतीत केली, दुसरे छत्रपती धर्मवीर श्री. संभाजी महाराज ह्यांची महत्वाची जडणघडण राजगडाने पाहिली. समस्त हिंदू बांधव गडदुर्ग सेवा समिती मार्फत ह्याच दुर्गदुर्गेश्वर राजगडाला स्वच्छतेच्या स्वरूपात सेवा अर्पण केली.
ही सेवा अर्पण करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक शिवभक्तांनी हजेरी लावली आणि बघता बघता पहाटे 6 वाजता संख्या ११६ लोकांवर गेली
ह्या मोहिमेअंतर्गत गडावरील सर्व प्लास्टिक तसेच काचेच्या बाटल्या व अन्य अविघटनशिल वस्तू गोळा करून गडावरून खाली न्हेऊन त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली. त्याच प्रमाणे संस्थेचे अध्यक्ष श्री.रवींद्र पडवळ ह्यांच्या मार्फत दुर्ग विज्ञान,गड पाहण्याची दृष्टी आणि गड आत्मसात करण्याची विचारसरणी सर्वांना समजवण्यात आली.समाजाला नवीन दिशा देण्यासाठी सर्वांनी जातीयवाद सोडून एकत्र होण्याची किती गरज आहे ह्याचे मार्गदर्शन उपस्थितांना केले गेले..
समस्त हिंदू बांधव सामाजिक संस्था ही गड दुर्गांसाठी स्वतंत्र महामंडळाची मागणी मागील अनेक दिवसापासून करत असून त्या मागील अभ्यास आणि न्यायव्यवस्थेचा आधार घेऊन केलेली बांधणी आलेल्या शिवभक्तांना पूर्णपणे समजवली गेली.
छत्रपती श्री शिवाजी महाराज ह्यांचा राजगडावर राज्यभिषेक सोहळा करण्याचे सदर संस्थेचे चौथे वर्ष आहे.अशी माहिती संस्थे कडून मिळाली.