29/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

‘रमा राघव’ मालिकेतून गौतम जोगळेकरांनी घेतला ब्रेक..

Share Post

‘रमा राघव’ ही कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका असून या मालिकेतील रमा आणि राघव यांची लव्हस्टोरीही तितिकीच चर्चेत आहे. सध्या या जोडीच्या लग्नाच्या बोलणीचा उत्कंठावर्धक टप्पा सुरू असताना,रमाच्या वडिलांची भूमिका करणारे नट बदल्ल्याने प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
या मालिकेतील गिरीश परांजपे म्हणजेच रमाच्या वडिलांची भूमिका साकारणारे गौतम जोगळेकर यांनी वैद्यकीय कारणास्तव मालिकेतून ब्रेक घेतला असं कळतंय. रमा राघवच्या ऑफिशियल पेजवर एक व्हिडीओ पोस्ट झाला आहे, ज्यात गौतम जोगळेकर यांनी मालिकेतून ब्रेक घेतल्याचे सविस्तर कारण सांगितले आहे. तर त्यांच्या जागी आता गिरीश परांजपेंच्या भूमिकेत श्रीरंग देशमुख पाहायला मिळता आहेत. श्रीरंग देशमुख आणि गौतम जोगळेकर हे चांगले मित्र आहेत.
या व्हिडीओमधून कारण स्पष्ट होते की, गौतम जोगळेकरांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याची सर्जरी करायची असल्याने त्यांना मालिकेतून ब्रेक घ्यावा लागला. गिरीश परांजपे या भूमिकेवर प्रेक्षकांनी खूप प्रेम केले त्यासाठी त्यांनी प्रेक्षकांचे आभार देखील मानले. तसेच आता रमाच्या वडिलांची भूमिका साकारणारे श्रीरंग देशमुख हे त्यांचे मित्र असून त्यांनाही तितकंच प्रेम द्या असं प्रेक्षकांना आवाहन केले आहे.

तेव्हा नक्की पाहा, रमा राघव, सोम-शुक्र, रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.