रक्तदान शिबीरास प्रतिसाद, 113 जणांचे रक्तदान
बोपोडी येथे आयोजित रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण ११३ जणांनी रक्तदान केले. गोदाई सोशल फाउंडेशन अध्यक्ष व पुणे शहर कॉग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनोद दादासाहेब रणपिसे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे ब्लड सेंटरच्या माध्यमातून सर्व्हे नं. 26 लुंबिनी बुध्द विहार भीमज्योत नगर बोपोडी येथे रक्तदान शिबीर आयोजित केले होते. गेल्या दहा वर्षापासून रक्तदान शिबीराचे आयोजन केले जात आहे. सदर शिबिराचे उद्घाटन शहराध्यक्ष अरविंद शिंदे, मोहनदादा जोशी, अभय छाजेड, गोपालदादा तिवारी, दत्ताबाप्पू बहिरट , प्रदीप गायकवाड , संगिताताई तिवारी , अनिलजी पवार , राजेंद्र भुतडा, ॲड नंदलाल धिवार , ॲड, रमेश पवळे सर , विशाल जाधव, करीम शेख , सुंदरताई ओव्हाळ, इंद्रजीत भालेराव , ॲड विठ्ठल आरुडे , कांताताई ढोणे , चेतन अगरवाल , भोला वांजळे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून झाले. रक्तदात्याला यावेळी हेल्मेंट व सॅग गिफ्ट देण्यात आले.
यावेळी विजय कांबळे, योगेश पवार, जॉन पॅट्रीक, हरिश अबनावे , हेन्री अलमेडा, निखिल गायकवाड, आकाश मोरे , सुनिल अल्हाट ,अखिल गायकवाड , आशुतोष जाधव , निखिल जल्लावर , साजिद शेख, डॉ.दत्तप्रसाद राऊत, जयश गावडे, विकास कांबळे, आकांश चव्हाण, उषाताई जाधव , चैत्राली लोंखडे इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते .कार्यक्रम चे आयोजन भिमज्योत तरूण मंडळ, भिमज्योत महिला मंडळ, भिमज्योत स्पोर्ट्स क्लब , गोदाई सोशल फाउंडेशन , सरगम मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते.