23/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांचा कोथरूड मध्ये शाखांचा चौकार

Share Post

युवा सेना कोथरूड यांच्या वतीने गरवारे कॉलेज, एमआयटी कॉलेज, कावेरी कॉलेज, यशवंतराव मोहिते कॉलेज या कॉलेजच्या युवा सेनेच्या शाखांचे उद्घाटन युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळी बारा वाजल्यापासून शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रथम गरवारे कॉलेजच्या दारात युवा सेनेच्या शाखेचे उद्घाटन झाले, त्यानंतर कावेरी कॉलेज, एमआयटी कॉलेज व यशवंतराव मोहिते कॉलेज या ठिकाणी जाऊन शाखांचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी युवकांना वरूण सरदेसाई यांच्या हस्ते शिवबंधन बांधून सन्मानित करण्यात आले . तसेच तरुणींचा पण सहभाग मोठ्या प्रमाणात होता. यामुळे कॉलेज मधिल विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळाल्या सारखे वाटले.

याप्रसंगीविस्तारक पुणे शहर अजिंक्य धात्रक, राजेश पळसकर, अविनाश बलकवडे,रामभाऊ थरकुडे, युवराज पारीक, मयूर भांडे, आनंद भिलारे, गणेश काकडे,मयूर भालेकर, कैलास मोरे,आकाश झांजले, संतोष अवघडे साहिल पळसकर रोहित सुतार शिवसेना शहर प्रमुख गजानन थरकुड़, चंद्रकांत बराटे, दिलीप जानोरकर, जयदीप पडवळ तसेच कोथरूड विधानसभा अधिकारी वैभव मारुती दिघे उपस्थित होते.