युनायटेड इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचे सम्मेलन संपन्न
शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा मारून जुन्या आठवणींना उजाळ दिला. या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठ झालो हे विसरून गेले होते. निमित्त होते चिपळून येथील युनायटेड इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे. या स्नेह संमेलनाचे औपचारी उद्घाटन प्रसिद्ध मराठी अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांच्या हस्ते करण्यात आले. युनायटेड इंग्लिश स्कूल प्रशालेचे १९७६-७७ मधील दहावी उत्तीर्ण माजी विद्यार्थ्यांचा दोन दिवसीय स्नेह संमेलन नुकताच खंडाळा येथील निर्सगरम्य ठिकाणी संपन्न झाला. या शाळेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात काम करीत असून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे. स्मिता गद्रे व सामाजिक कार्यकता किशोर पेडणेकर व त्यांच्या सहकारी मित्रांनी हा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला होता.सर्व माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वांनी आपला परिचय दिला. त्यावेळेच्या काही गमतीदार आणि काही चांगल्या आठवणींना उजाळा दिला. अनेक विद्यार्थी पुण्याबरोबरच चिपळूण, मुंबई, सांगली, चिंचवड, दापोली, वाई, ठाणे आणि अन्य ठिकणाहून जवळपास शेकडो विद्यार्थी एकत्रित आले होते.यावेळी माजी विद्यार्थ्यांचा गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याता आला होता. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असतांना जीवनात यश मिळवले असले तरी त्यामागे शाळेचे संस्कार आहेत. अशी भावना अनेक माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी आपली कलागुण सादर केली. कार्यक्रमाची सुरूवात तृप्ती गंद्रे यांच्या गणेश स्तवनाने झाली. त्यानंतर अंजली कुलकणी, स्नेहा मराठे, तृप्ती गंद्रे, तुषार गंद्रे, किशोर पेडणेकर व गोविंद गोवळकर यांनी भावगीत, सिनेसंगीत व शास्त्रीय संगीत सादर केले. तसेच मेघना चितळे, तृप्ती गंद्रे व बिपिनचंद्र चौगुले यांनी स्वरचित कविता सादर केली. स्मिता गद्रे यांनी नृत्य सादर केले. मेघना चितळे व नीलम माळवदे यांनी कथावाचन केले. या वेळी शाळेतील आठवणींना उजाळा देऊन वेगवेगळे गंमतीचे खेळ खेळले.या प्रसंगी रोहित मराठे व अभिजीत बारटक्के या कलाकारांनी हॉर्मोनिअम व तबला वादानाने सर्वांचे मन तृप्त केले. शांती पिसे यांनी सादर केलेल्या नृत्यांमुळे वातावरणात बहार आली.आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार गंद्रे, शांती पिसे यांनी खूपच रंगतदार केले. कार्यक्रमाची सांगता किशोर पेडणेकर यांनी आभार प्रदर्शन व पुढील कार्यक्रमाची घोषणा करून केली.बॉक्स अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड याची मुलाखत बिपिनचंद्र चौगुले व स्मिता गद्रे यांनी घेतले.डॉ. निशिगंधा वाड यांनी सांगितले की आईवडिलांनी अत्यंत मुक्तपणे वाढू दिल्यामुळे विविध क्षेत्रात सहजतेने वावरणं शक्य झाले व त्यात यश मिळाले. बोर्डामध्ये मेरिटला येऊन देखील कला क्षेत्राची निवड केली. अभिनय, घरातल्या जबाबदार्या व समाजकार्य करून स्वतःची आवड आणि इच्छा म्हणून मी आता चौथी पीएचडी शांता शेळकेंच्या कवितांवर करीत आहे. तसेच समाजकार्य करतांना विशेषःता मुस्लिम मुली, कौटुंबिक हिंसा, झोपडपट्टी पुनर्वसन, वेश्यांची मुल, अशा क्षेत्रात झोकून देऊन काम करीत आहे.