युतिका सोसायटीतील एमएनजीएलसाठी डीआरएस प्रणालीचे लोकार्पण
राज्याच्या प्रगतीसाठी माननीय एकनाथजी आणि देवेंद्रजी कार्यरत आहेत. त्यातच अजितदादा पवार यांचीही साथ मिळाली आहे. त्यामुळे लोककल्याणासाठी पुण्यात दोन्ही दादा एकत्र आहेत. त्यामुळे जनहिताचे प्रकल्पांना गती मिळत आहे, असे प्रतिपादन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
कोथरुड मतदारसंघातील बाणेर पश्चिम, सूस- म्हाळुंगे आणि पाषाण येथील सोसायटी भागातील नागरिकांची अनेक वर्षांपासून महानगर गॅस व्यवस्था उपलब्ध व्हावी; अशी मागणी होती. त्यांची ही मागणी पूर्ण करण्यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी पाठपुरावा करून महाराष्ट्र नॅचरल गॅसला डीआरएस प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी महापालिकेची जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे बाणेरमधील पाच हजार नागरिकांना महानगर गॅसची व्यवस्था उपलब्ध झाली. याचे लोकार्पण युतिका सोसायटीत आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी भाजपा नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, भाजपा कोथरुड उत्तर अध्यक्ष सचिन पाषाणकर, लहु बालवडकर, उमाताई गाडगीळ, अस्मिता करंदीकर, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, युवा मोर्चा अध्यक्ष रोहन कोकाटे, सचिन दळवी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष समीर चांदोरे यांच्या सह युतिका सोसायटीचे सर्व रहिवासी उपस्थित होते.
नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचा देशातील वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आग्रह आहे. त्यांच्याच प्रेरणेतून राज्यात एकनाथजी आणि देवेंद्रजी फडणवीस यांचे सरकार काम करत आहे. त्यात आता अजितदादा पवार यांचीही साथ मिळाली आहे. त्यामुळे जनहिताचे प्रकल्पांना गती मिळत आहे. पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी शहरात मेट्रोचं जाळं उभारलं जात आहे. डिसेंबर मध्ये विमानतळ परिसरातील मेट्रो प्रकल्प कार्यान्वित होईल.तसेच २४×७ च्या माध्यमातून ८२ पाण्याच्या टाक्या उभारल्या जात आहेत. याशिवाय सांडपाणी शुद्धीकरणासाठी एसटीपी प्रकल्प उभारले जात आहेत.
नामदार पाटील पुढे म्हणाले की,कोथरुड मध्ये १०० आदर्श सोसायटी निर्माण करण्याचा प्रयत्न असून, त्यासाठी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या सोसायटी मध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग, कचरा निर्गत प्रकल्प यांसारखे उपक्रम सुरू करावेत.यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. तसेच, कोथरुड मधील पाचशे सोसायटींमध्ये लोकसहभागातून सॅनिटरी पॅड व्हेडिंग आणि व्हॅनिशिंग मशीन कार्यान्वित करण्यात येत असून, त्याचाही सोसायटीने लाभ घ्यावा असे आवाहन श्री. पाटील यांनी यावेळी केले.