मोहोळांचे मताधिक्य वाढविण्यासाठी चंद्रकांत पाटलांच्या बैठका
पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्व सुत्रे आपल्या हाती घेतली आहेत. दोन दिवस पक्षाच्या सर्व आघाड्यांच्या बैठका घेऊन मताधिक्य वाढविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी काम करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.मोहोळांचे मताधिक्य वाढविण्यासाठी चंद्रकांत पाटलांच्या बैठका
लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराला वेग मिळाला आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. शुक्रवारी महिला मोर्चा, ओबीसी मोर्चा, व्यापारी आघाडी, मंडल अध्यक्ष, विस्तारक सोशल मीडिया आणि आयटी सेल यांची बैठक घेतली. शनिवारी अनुसूचित जाती मोर्चा, झोपडपट्टी आघाडी, वैद्यकीय आघाडी, पर्यावरण आघाडी, उत्तर व दक्षिण भारतीय आघाडी, अल्पसंख्याक आघाडी, सहकार, पायाभूत सुविधा, शिक्षक भटके विमुक्त आघाडी यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन निवडणूक तयारीचा आढावा घेतला.
नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी गेल्या दहा वर्षांत सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्या आहेत. आपल्या मानबिंदूंची पुनर्स्थापना केली आहे. त्यामुळे त्यांचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावे.आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना उच्च शिक्षण घेणे सोपे व्हावे यासाठी; आठ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना शिक्षण मोफत केले. आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन निधी उपलब्ध करून दिला.
या बैठकीला शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, पुणे लोकसभा निवडणूक प्रभारी श्रीनाथ भिमाले, सरचिटणीस पुनीत जोशी, राघवेंद्र बापू मानकर, रवी साळेगावकर यांच्या सह भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी सर्वच आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मुरलीधर मोहोळ विक्रमी मतांनी विजयी होतील, असा संकल्प व्यक्त केला.मोहोळांचे मताधिक्य वाढविण्यासाठी चंद्रकांत पाटलांच्या बैठका