“मोतीबिंदूमुळे येणाऱ्या अंधत्वासाठी दादा लेझर आय इन्स्टिट्यूटने सुरू केली मोहीम .
दादा लेझर आय इन्स्टिट्यूट (DLEI), ही पुण्यातील एक अग्रगण्य आय केयर फॅसिलिटी असुन त्यांनी मोतीबिंदू द्वारे येणार्या अंधत्वास (कॅटरॅक्ट ब्लाइंडनेस ) रोखण्यासाठी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे., मोतीबिंदूमुळे दृष्टी गमावण्या सारख्या गंभीर परिणामांबद्दल जागरूकता आणण्यासाठी ते एक मोहीम सुरू करत आहेत.
या समस्येची गंभीरता ओळखून, द अमेरिकन ऍकॅडमी ऑफ ऑप्थॅल्मोलॉजी (AAO) आणि ऑल इंडिया ऑप्थॅल्मोलॉजिकल सोसायटी (AIOS) यांनी जून २०२३ हा “मोतीबिंदू जागरूकता महिना” म्हणून घोषित केला आहे.
या गंभीर समस्येचे निराकरण करण्यासाठी दादा लेझर आय इन्स्टिट्यूटचे संचालक आणि जगातील सर्वात जलद आणि सुरक्षित व्हिजन करेक्शन टेक्नीक (दृष्टी सुधारण्याचे तंत्रज्ञान) – VOZ आणि SAFE चे शोधकर्ता डॉ. जीवन लाडी, १ जून २०२३ पासून मोतीबिंदूमुळे येणाऱ्या अंधत्वास टाळण्यासाठीच्या मोहिमेचे नेतृत्व करणार आहेत. ज्यात डीएलईआय (DLEI) चे उदिष्ट आहे १०,००० नागरिकांना मोफत मोतीबिंदू चाचणी प्रदान करणे, या प्रति चाचणीचे मुल्य आहे १००० रूपए म्हणजेच ते एकून १ कोटी रूपयांच्या निशुल्क तपासनीद्वारे आपले मोठे योगदान देत आहेत.
मोफत नेत्र तपासणी शिबिरासोबतच, दादा लेझर आय इन्स्टीट्यून ने रविवार, ४ जून २०२३ रोजी “मोतीबिंदू-मुक्त पुणे वॉकथॉन” (कॅटरॅक्ट फ्री पुणे वॉकेथॉन) चे आयोजन केले आहे. या वॉकथॉनची सुरुवात सकाळी ७.३० वाजता साधू वासवानी रोडवरील साधू वासवानी पुतळ्यापासून होईल आणि गुलमोहर अपार्टमेंट, ईस्ट स्ट्रीट, कॅम्प, पुणे ४११००१ येथे असलेल्या दादा लेझर आय इन्स्टिट्यूट येथे या वॉकथॉनची समाप्ती होईल.
यावेळी प्रमुख पाहुणे पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील आणि आर.जे संग्राम खोपडे बिग एफ.एम यांच्या हस्ते या वॉकथॉनला हिरवा झेंडा दाखवला जाईल आणि यातील समाजाच्या सहभागाचे महत्त्व पटवून देण्यात येईल. या मोतीबिंदू अंधत्व निवारणाच्या जनजागृतीसाठी पुणेकरांनी
मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डीएलईआय कडून करण्यात आले आहे.
“कॅटरॅक्ट वॉकथॉन” आणि मोफत मोतीबिंदू नेत्र तपासणीमध्ये सहभागी होण्यासाठी, त्वरीत नोंदणीसाठी (३० जून २०२३ पूर्वी) इच्छुक ९९२२९९५५४९ या डीएलईआयच्या अधिकृत क्रमांक वर कॉल करू शकतात. या मोफत मोतीबिंदू नेत्र तपासणीसाठी लवकर नोंदणी करणाऱ्यांना किंवा शस्त्रक्रियेसाठी देखील २० % सवलत मिळेल.