18/07/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

मैत्रीची तरल भावना व्यक्त करणार ‘मुसाफिरा’ टायटल सॉन्ग

Share Post

आनंद पंडित मोशन पिक्चर्स, ऐश मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने, नितीन वैद्य प्रोडक्शन्स आणि गुझबम्प्स एंटरटेन्मेंट प्रस्तुत ‘मुसाफिरा’ या चित्रपटाच्या भव्य पोस्टरचे अनावरण आणि प्रदर्शनाची तारीख काही दिवसांपूर्वीच एका दिमाखदार सोहळ्यात घोषित करण्यात आली. या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता वाढलेली असतानाच आता या चित्रपटातील ‘मुसाफिरा’ हे टायटल सॉन्ग संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे. एका शानदार सोहळ्यात हे गाणे प्रदर्शित करण्यात आले. या वेळी दिग्दर्शक पुष्कर जोग, निर्माते आनंद पंडित, नितीन वैद्य, वितरक नानूभाई जयसिंघानी, पुष्कराज चिरपुटकर, पूजा सावंत, स्मृती सिन्हा, दिशा परदेशी आदी उपस्थित होते. या सोहळ्यात चित्रपटातील कलाकारांनी या गाण्यावर परफॉर्मन्सही सादर केला. हे गाणे बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक विशाल दादलानी यांनी गायले आहे. या एनर्जीने भरलेल्या टायटल सॉन्गला रोहन – रोहन यांचे संगीत लाभले असून हे गाणे मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केले आहे. तरुणाईला आवडेल असे हे गाणे आहे. मैत्रीचे नाते हे नेहमीच खास असते. एकत्र फिरणे, हसणे, खेळणे, रडणे अशा अनेक गोष्टी मैत्रीत केलेल्या असतात, अगदी भांडणेही. मैत्रीच्या या अशाच सुखद आठवणींना उजाळा देणारे आणि दूर गेलेल्या मित्रांना एकत्र आणणारे हे गाणे आहे. यात धमाल, प्रेम, मैत्री अशा अनेक भावना आहेत.