मुरलीधर मोहोळांनी घेतली सुनिल देवधरांची भेट
पुणे लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराचा जोर हळूहळू वाढू लागला आहे. मोहोळ यांना विविध क्षेत्रातून आणि विविध समाजातून पाठिंबा मिळत आहे. दुसरीकडे लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या भाजपच्या नेत्यांचाही मोहोळ यांना पाठिंबा मिळत असल्याने मोहोळांची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे.मोहोळ यांनी रविवारी देवधर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी देवधर यांनी पुष्पगुच्छ देऊन आणि तोंड गोड करुन मोहोळ यांचा स्वागतपर सन्मान केला आणि विजयासाठी सदिच्छा दिल्या.मुरलीधर मोहोळांनी घेतली सुनिल देवधरांची भेट
या सर्व इच्छुकांनी उमेदवारी जाहीर होण्याअगोदर इच्छुक असल्याची इच्छा व्यक्त करताना शेवटी पक्षाचा आदेश हा अंतिम असल्याचे म्हटले होते. आत्ता स्पर्धेत असलो तरी आमच्यापैकी पक्ष ज्या कोणाला उमेदवारी देईल तेव्हा सर्व गोष्टी विसरून त्याच्या पाठीमागे उभे राहण्याचे भाजपची शिकवण असल्याचेही त्यांनी म्हटले होते. त्याची प्रचिती भाजपमध्ये येत आहे.त्या कॉँग्रेस पक्षात अजूनही नेत्यांमध्ये समन्वय नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम दिसून येत आहे. महायुतीचे उमेदवार मोहोळ यांनी प्रचाराबरोबरच त्यांच्याबरोबर लोकसभेसाठी इच्छुक असलेल्यांच्या भेटीचा सपाटा लावला आहे. त्यामुळे त्यांची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. पक्ष नेतृत्वाने नाराजी दूर केल्यानंतर इच्छुक राहिलेले नेते अंगझटकून कामाला लागले आहेत.
मुरलीधर मोहोळ यांनी सुनील देवधर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी दोघांमध्येही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर संवाद झाला…पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघात मोठ्या विजयाचा निर्धारही केला.