17/07/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

‘माझं पिल्लू माझी जान’गाण्यात झळकणार उत्कर्ष शिंदे आणि झेबा शेख

Share Post

सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी गायलेलं’माझं पिल्लू माझी जान’गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मुख्य भूमिकेत अभिनेता उत्कर्ष शिंदे आणि अभिनेत्री झेबा शेख हे झळकणार आहेत.नुकतंच गाण्याचं पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं आहे. शिंदे बंधू एकत्र काम करणार असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी हे गाणं म्हणजे खास पर्वणी ठरणार आहे.
या गाण्याद्वारे अभिनेता उत्कर्ष शिंदे आणि अभिनेत्री झेबा शेख हे प्रेक्षकांना रोमँटिक अंदाजात दिसणार आहेत.ही एक प्रेम कथा असून उत्कर्ष शिंदे हा रांगड्या अंदाजात त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.
आतापर्यंत झेबाने आपल्या नृत्य कौशल्याद्वारे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. आता ‘माझं पिल्लू माझी जान’या गाण्याद्वारे ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घ्यायला सज्ज झाली आहे. झेबा हिने यापूर्वी ‘जानू विना रंगच नाय’, ‘व्वारं माझ्या सोन्या’, ‘चंपाबाई’, ‘हॉट तू मुलगी कडक’, ‘आयटम लय भारी’, ‘रावडी डांस’, ‘प्रेम आहे तुझ्यावर’, ‘प्रेम हे प्रेम हवे’ यामध्ये काम केले आहे.
विक्रांत राजपूत म्युझिक प्रस्तुत ‘माझं पिल्लू माझी जान’ गाण्याचे दिग्दर्शन नृत्य दिग्दर्शक बॉस्को सीजर यांचे सहाय्यक दिग्दर्शक रवी यांनी केले आहे. तर विक्रांत राजपूत यांनी गाण्याचे बोल आणि संगीत संयोजन केले आहे.हे गाणं १० फेब्रुवारी, २०२४ रोजी रिलीज होणार आहे.