23/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

महिलांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचारा विरुद्ध ‘ररा’ हिंदी लघुपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Share Post

पुणे:सद्ध्याच्या घडीला महिलांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचार प्रमाण पाहता प्रत्येक मुलीच्या अंगात राजमाता जिजाऊ माँसाहेब, सावित्रीबाई फुले, माता रमाई, झाशीची राणी आणि अहिल्याबाई होळकर संचारणे ही काळाची गरज आहे.तरच आज महिला आणि मुली सुरक्षित राहू शकतात.

महिलांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचारा विरुद्ध 'ररा' हिंदी लघुपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

याच विषयांवर आधारित शिवगर्जना क्रियेशन प्रस्तूत सचिन गवळी लिखित/दिग्दर्शित ‘ररा’ही हिंदी लघुपट बनवत आहेत.

या लघुपट मध्ये बिगबॉस मराठी विजेती अभिनेत्री मेघा धाडे, बालकलाकार पार्श्र्वी गादिया आणि सचिन गवळी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.तसेच गणेश शेजवळ, स्वप्नील गुडेकर, मच्छिंद्र बोरगुडे आणि यश जगताप हे सहकलाकार आहेत.कॅमेरा सचिन केदारी, केतन चिकणे तर प्रॉडकशन ची जबाबदारी निखिल खांदवे, अभय पोते, स्नेहलराज कारंडे, प्रणाली साबळे तसेच मेक अप नवीन परमार आणि शिवाजी गोडे यांनी केला. तर स्टील फोटोग्राफी प्रणव देवधर यांनी केली.
लवकरच ‘ररा’ हा हिंदी लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महिलांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचारा विरुद्ध 'ररा' हिंदी लघुपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
महिलांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचारा विरुद्ध ‘ररा’ हिंदी लघुपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला