महिंद्रातर्फे पहिले लहान आकाराचे ड्युएल- फ्युएल कमर्शियल वाहन लाँच ६.३० लाख रुपयांपासून सुरू
महिंद्रा अँड महिंद्रा लि. (एम अँड एम) या स्मॉल कमर्शियल व्हिइकल (एसयूव्ही) क्षेत्रात भारतात आघाडीवर असलेल्या कंपनीने आज सुप्रो सीएनजी ड्युओ हे पहिले ड्युएल- फ्युएल वाहन लाँच केले. स्मॉल कमर्शियल व्हिइकल क्षेत्रातील ते पहिले असे वाहन आहे. सुप्रो सीएनजी ड्युओ ग्राहकांना दर्जेदार पे-लोड, चांगले मायलेज आणि सर्वोत्तम कामगिरीसह, जास्तीत जास्त नफा मिळवून देण्यासाठी खास तयार करण्यात आले आहे.
सुप्रो सीएनजी ड्युओची किंमत ६.३० लाख रुपयांपासून सुरू (एक्स शोरूम पुणे) असून त्यात विविध वैशिष्ट्ये देण्यात आली आहे. नव्या सुप्रो सीएनजी ड्युओमध्ये देण्यात आलेली वैशिष्ट्ये या क्षेत्रात पहिल्यांदाच पाहायला मिळत आहेत. त्यात देण्यात आलेल्या डायरेक्ट-इन-सीएनजी स्टार्टमुळे गाडी सीएनजी मोडमध्ये सुरू करता येते व ग्राहकाच्या पैशांची चांगली बचत होते. त्याशिवाय सुप्रो सीएनजी ड्युओमध्ये सीएनजी गळती होत असल्यास ते सूचित करणारी खास सुविधा देण्यात आली, ज्यामुळे ग्राहकाची सुरक्षितता वाढते. त्याशिवाय सीएनजी आणि पेट्रोल पर्यायही सहजपणे बदलण्याची सोय यात आहे.
एम अँड एमच्या ऑटोमोटिव्ह विभागाचे अध्यक्ष विजय नाक्रा म्हणाले, ‘सुप्रो सीएनजी ड्युओचे लाँच महिंद्राच्या नाविन्यपूर्ण आणि विश्वासार्ह व्यावसायिक वाहने तयार करण्याच्या परंपरेचे प्रतीक आहे. ग्राहकांचा अभिप्राय आणि गेल्या दशकभरापासून बाजारपेठेत असलेले आघाडीचे स्थान यांच्या मदतीने हे वाहन तयार करण्यात आले आहे. सुप्रो सीएनजी ड्युओद्वारे कंपनी ड्युएल- फ्युएल क्षेत्रात प्रवेश करत आहे. त्यातून वाहनमालक व चालकांना येणारा वाहनाचा खर्च कमी होईल. लॉजिस्टिक्स, पुरवठा साखळी आणि ई- कॉमर्स कंपन्यांच्या आव्हानात्मक मागण्या पूर्ण करण्याच्या हेतूने या वाहनाची बांधणी करण्यात आली आहे. सुप्रो सीएनजी ड्युओ लाँच करत महिंद्राने व्यवसाय तसेच समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे आपले तत्व परत एकदा जपले आहे.’एम अँड एमच्या ऑटोमोटिव्ह टेक्नोलॉजी आणि उत्पादन विकास विभागाचे अध्यक्ष आर. वेलूसामी म्हणाले, ‘सुप्रो सीएनजी ड्युओ स्मार्ट आणि सहजपणे वापरता येण्यासारखे ड्युएल फ्युएल स्मॉल कमर्शियल व्हिइकल आहे. हे वाहन उत्सर्जन कमी करण्यास मदत करते, शिवाय ते वापरण्याचा खर्चही कमी आहे. यामुळे मोठी बचत करणे शक्य होते. आम्ही नव्या सुप्रो सीएनजी ड्युओमध्ये या क्षेत्रातील सर्वात नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहे.