18/07/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

महालक्ष्मी मंदिरात १ हजार वारक-यांची आरोग्य तपासणी

Share Post

आपले वय किंवा आजाराचा विचार न करता विठुरायाच्या भेटीच्या ओढीने कित्येक किमी पायी वारी करणा-या वारक-यांसाठी सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. पायदुखी, डोकेदुखी, सर्दी, अंगदुखी, खोकला अशा प्राथमिक आजारांपासून ते रक्तदाब, उच्च शर्करा सारख्या आजारांपर्यंत सर्वच आजारांविषयीची वारक-यांची तपासणी करण्यात आली. शिबीरात तब्बल १ हजारहून अधिक वारक-यांनी सहभागी होत आरोग्य तपासणी केली.

श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने मंदिरामध्ये वारक-यांसाठी आरोग्य तपासणी शिबीर व मोफत औषधे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते. पौष्टीक आहार म्हणून सर्व वारक-यांना राजगिरा लाडू देखील देण्यात आले.

अमिता अग्रवाल म्हणाल्या, कान, नाक, घसा यांसह इतरही अनेक तपासण्या यावेळी करण्यात आल्या. तीन तज्ञ डॉक्टरांसह रुग्णवाहिकेमध्ये औषध वाटप करण्यात आले. ज्या वारक-यांना इतरही काही आजार आढळून आले, त्यांना योग्य सल्ला व मार्गदर्शन डॉक्टरांनी दिले. पायी वारीच्या माध्यमातून विठ्ठलाची सेवा करणा-या वारक-यांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरीता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

*फोटो ओळ : श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने मंदिरामध्ये वारक-यांसाठी आरोग्य तपासणी शिबीर व मोफत औषधे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वारक-यांची तपासणी करताना डॉक्टर्स.