29/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते दादरमधील ‘चिकित्सा – knee  spine and more….उपचार केंद्राचं उद्घाटन..

Share Post

पुणे   :  प्राचीन नैसर्गिक उपचारांचा फायदा घ्या,ऑपरेशन टाळा..आणि दुखण्याला कायमचं दूर पळवा..डॉ.रमाकांत देवरुखकर यांच्या ”चिकित्सा वेलनेस मॅनेजमेंट कंपनीचं ‘गुडघे आणि मणक्या’च्या विकारांवर उपचार करणारं नवं अद्ययावत उपचार केंद्र आता आपल्या दादरमध्येगेली 4 दशंक प्राचीन नैसर्गिक उपचार पद्धतीचा प्रचार आणि प्रसार चिकित्सा वेलनेस मॅनेजमेंट ही संस्था करत आली आहे.आपल्या संस्थेच्या माध्यमातून योग,आयुर्वेद, मर्मचिकित्सा, ॲक्युपंक्चर व इतरही प्राचीन उपचार पद्धती अधिकाधिक गरजू रुग्णांपर्यंत पोहोचाव्यात आणि त्यांना त्याचा लाभ व्हावा हा एकमेव उद्देश्य संस्थेचा आहे. यासाठी चिकित्सा वेलनेस मॅनेजमेंटनं मुंबई,पुणे ,नाशिक अशा अनेक ठिकाणी आपल्या संस्थेची उपचार केंद्र स्थापन केली आहेत. आता संस्थेनं एक पाऊल पुढे टाकत मुंबईत दादरमधील हार्ट ऑफ दादर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी पार्क इथं आपलं नवीन अद्ययावत उपाचार केंद्र सुरु केलं आहे. या ठिकाणी गुडघे आणि मणक्याच्या विकारांवर उपचार करण्यावर अधिक भर दिला जाईल..असं डॉ. रमाकांत देवरुखकर उपचार केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी म्हणाले. २६ जानेवारी या आपल्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत चिकित्सा वेलनेस मॅनेजमेंटच्या दादरमधील या नवीन उपचार केंद्राच उद्घाटन करण्यात आलं. या नवीन उपचार केंद्राचे उद्धाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी मनसे नेते अमेय खोपकर, नितिन सरदेसाई, अॅडगुरू भरत दाभोळकर असे मान्यवर उपस्थित होते. सर्वांनीच डॉ.रमाकांत देवरुखकर यांच्या उपचार केंद्राला शुभेच्छा दिल्या.अॅडगुरु भरत दाभोळकर यांनी डॉ. रमाकांत देवरुखकर यांच्या प्राचीन नैसर्गिक उपचार पद्धतीचा अधिकाधिक रुग्णांनी फायदा घ्यावा असं आवाहनही केलं आहे.  भरत दाभोळकर म्हणाले, ”मी अनेक वर्षांपासून डॉ.देवरुखकर यांना ओळखतो. त्यांच्या उपचार पद्धतीचा माझ्या अनेक सेलिब्रिटी मित्रांनी फायदा घेतला आहे. यात विजू खोटे,किशोर प्रधान,रामदास पाध्ये यांची नावे मी आवर्जुन घेईन. डॉ. देवरुखकर यांना थेट आफ्रिका,लंडनमधील व्यावसायिक खास आपल्या दुखण्यावर उपचार करून घेण्यासाठी बोलावतात असं देखील भरत दाभोळकर यांनी सांगितलं.  उद्घाटन प्रसंगी आपल्या उपचार केंद्रात होणाऱ्या उपचार पद्धतीं विषयी बोलताना डॉ. रमाकांत देवरुखकर म्हणाले,”आज दादर येथे चिकित्सा वेलनेस मॅनेजमेंटचे जे अद्ययावत सोयी उपलब्ध असलेलं  नवं उपचार केंद्र सुरु झालं आहे तिथे आम्ही खासकरुन गुडघे आणि मणक्यावरील दुखण्यावर उपचार करणार आहोत. आजकाल गुडघे आणि मणक्याची दुखणी खूप वाढत चालली आहेत. लोकांना अनेकदा ऑपरेशनचा मार्ग सोपा वाटतो. बरं वाटण्यासाठी कितीही औषधं घ्यायला लोक तयार असतात. झटपट बरं वाटावं म्हणून हा सगळा खटाटोप असतो. पण त्यातनं पुढे पदरात निराशाच पडते. म्हणूनच आम्ही गुडघे आणि मणक्यावर डॉ.राम भोसले यांच्या अभ्यासातून पुढे आलेल्या प्राचीन उपचार पद्धतींचा अवलंब करणार आहोत”.डॉ.रमाकांत देवरुखकर पुढे म्हणाले,”डॉ.राम भोसले हे महात्मा गांधींचे डॉक्टर होते.  त्यांनी आपल्या प्राचीन वैद्यकीय उपचारांचा जगभर प्रसार केला,आता आम्ही हा वारसा पुढे नेत आहोत. दादरमधील आमच्या या नवीन उपचार केंद्रात एकाच ठिकाणी सर्वप्रकारच्या सोयी उपलब्ध होतील आणि रुग्णांना धावपळ होणार नाही याचा विचार आम्ही केला आहे. इथे आयुर्वेद, अॅडव्हान्स फिजिओथेरपी आणि विविध गोष्टींचे कॉम्बिनेशन करुन केलेल्या वेगवेगळ्या उपचार पद्धतींचा रुग्णांना लाभ घेता येईल.  रुग्णांना लवकरात लवकर बरं कसं वाटेल आणि तो सुदृढ होऊन स्वतःच्या पायावर कसा उभा राहिल यासाठीच गुडघे दुखी आणि मणक्याच्या विकारांवर उपचार करणारं हे अद्यायावत उपाचार केंद्र आजपासून आम्ही सुरू करत आहोत”.प्राचीन उपचार पद्धतींचा फायदा अधिकाधिक रुग्णांना व्हावा म्हणून डॉ.रमाकांत देवरुखकर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या उपचार पद्धतींचा प्रचार आणि प्रसार करत आले आहेत. अनेक टी.व्हीवरील शोजमधनं त्यांनी प्राचीन उपचार पद्धतीवर मार्गदर्शन केलं आहे. त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून ते लोकांमध्ये प्राचीन निसर्गोपचारांबद्दल जागृती यावी यासाठी शिबिरांचे देखील आयोजन करतात. डॉ.देवरुखकर हे केवळ चिकित्सा वेलनेस मॅनेजमेंटचे संस्थापक नाहीत तर महाराष्ट्र सरकारच्या पॅरामेडिकल कमिटीचे सदस्य(महाराष्ट्र बोर्ड ऑफ व्होकेशनल एज्युकेशन एक्झामिनेशन) देखील ते आहेत. तसंच,इंटरनॅशनल स्कूल ऑफ अल्टरनेटिव्ह मेडीसिन,भारत या संस्थेच्या अध्यक्ष पदावर देखील ते कार्यरत आहेत. आज महाराष्ट्रातील एक प्रथितयश उपचार केंद्र म्हणून चिकित्सा वेलनेस मॅनेजमेंटकडे पाहिलं जातं. तेव्हा ऑपरेशन टाळायचं असेल अन् दुखण्याला कायमचं पळवायचं असेल तर चिकित्सा वेलनेस मॅनेजमेंटच्या प्राचीन नैसर्गिक उपचार पद्धतींना पर्याय नाही हे वेळीच लक्षात घ्या.