महाराष्ट्र कीर्ति सौरभ प्रतिष्ठान आयोजित शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार आणि श्रीमंत मोरेश्वर बळवंत पुरंदरे शिष्यवृत्ती प्रदान सोहळा !
२०२३ या वर्षाचा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार दि.२० ऑगस्ट २०२३ रोजी जेष्ठ अभिनेते श्री अशोक सराफ यांना महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते तसेच पुण्याचे पालकमंत्री आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षततेखाली प्रदान करण्यात येणार आहे. तसेच आदरणीय बाबासाहेबांच्या वडीलांच्या नावे श्रीमंत मोरेश्वर बळवंत पुरंदरे शिष्यवृत्ती इतिहास अभ्यासक श्री प्रसाद तारे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम रविवार,दिनांक २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वा. बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे श्री गो. बं. देगलूरकर सर, माजी महापौर श्री. मुरलीधर मोहोळ,श्री अमृतराव पुरंदरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या वेळी पुरस्कार वितरण आणि शिवराज्याभिषेक सोहळा सादर केला जाणार आहे.
कार्यक्रमासाठी सर्वाना मुक्त प्रवेश असणार आहे