NEWS

महाराष्ट्राची सांस्कृतिक सफर म्हणजे भीमथडी- संयोगीताराजे

Share Post

संभाजी छत्रपती महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याचा नावलौकिक आहे. विद्येच्या या माहेरघरात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकात्मतेची सफर म्हणून भीमथडीकडे पाहता येईल असे प्रतिपादन संयोगीताराजे संभाजी छत्रपती यांनी 16 व्या भीमथडी जत्रेच्या उदघाटन प्रसंगी केले.

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याचा नावलौकिक आहे. विद्येच्या या माहेरघरात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकात्मतेची सफर म्हणून भीमथडे पाहता येईल असे प्रतिपादन संयोगीताराजे संभाजी छत्रपती यांनी 16 व्या भीमथडी जत्रेच्या उदघाटन प्रसंगी केले.या वेळी स्वीझरलँड दूतावासातील फ्लोरिन म्युलर, डॉ राल्फ हॅकनेर, मार्टिन मायर यांच्यासह बारामती टेक्स्टाईल पार्क च्या सुनेत्रा पवार, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, मुख्य कार्यकारी अधिकारी टापरे , राहुरी कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ मासाळकर, अग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचे चेअरमन मा. राजेंद्र पवार, भीमथडीची अयोजिका सुनंदा पवार विश्वस्त विष्णुपंत हिंगणे, अविनाश बारवकर, राजीव देशपांडे, मगर साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.

संयोगीताराजे संभाजी छत्रपती पुढे म्हणाल्या की महाराष्ट्राला परंपरेतच एकात्मता दिसते. ग्रामीण व शहरी संस्कृतीचा सुवर्ण मध्ये साधण्याचे काम भीमथडी गेली 15 वर्ष सातत्याने करत आहे. भीमथडीच्या आयोजना बाबत बोलताना सुनंदताई म्हणाल्या की 2023 हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष वर्ष असल्याने भरडधण्याविषयी जनजागृती चालू आहे. भरड धान्य आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असल्याने त्याचा आहारातील वापर वाढला आहे. रोजच्या आहारातील गहू तांदूळ या मधे असेलेले ग्लूटेन व कार्बोहायड्रेड हे आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक असून त्याच्याअति सेवनाने आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. राळे , भगर, सावा ,बर्टी वरई,या प्रकाराची भरड धान्य आरोग्यास उपयुक्त असून बरेच आजार त्यामुळे बरे होतात. या शिवाय टाकाऊतून टिकाऊ, महाराष्ट्राची कला संस्कृती , पर्यावरण संवर्धन, एकात्मिक शेती असे विविध दालने या भीमथडीत आहेत. दिनांक21 डिसेंबर ते 25 डिसेंबर या कालावधीत सुरू असणाऱ्या भिमथडीला पुणेकरांनी भेट दयावी असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *