29/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

महाराजा अग्रसेन जंयती निमित्त अग्रसेन क्रिकेट लीगचे आयोजन 30 सप्टेंबर पासून अग्रसेन क्रिकेट लीग

Share Post

15 ऑक्टोबर 2023 रोजी होणार्‍या श्री महाराजा अग्रसेन यांच्या जंयती निमित्त फिटनेस मंत्र देण्याच्या उद्देशाने व खेळांना प्रोत्साहन देने, अग्रवाल समाजाच्या युवकांना एकत्रित आणण्यासाठी अग्रसेन क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले आहे. या जिल्हास्तरीय क्रिकट स्पर्धेची घोषणा महाराजा-अग्रसेन जयंती क्रिकेट स्पर्धेचे अध्यक्ष व अखिल भारतीय अग्रवाल सभा पुणे शहर उपाध्यक्ष अनिल मित्तल यांनी केली.
श्री महाराजा अग्रसेन यांच्या जंयती निमित्त पुणे जिल्ह्यातील अग्रवाल बंधुना एकजूट करण्यासाठी अखिल भारतीय अग्रवाल सभाच्या अंतर्गत महाराजा-अग्रसेन जयंती क्रिकेट स्पर्धाची स्थापना करून अग्रसेन क्रिकेट लीगचे आयोजन 30 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर दरम्यान करणयात आले आहे. अग्रसेन क्रिकेट लीग मध्ये अग्रवाल समाजाच्या 18 गोत्रांचे प्रतिनिधित्व करणारे 18 संघ असून 12 पुरुष गट, 4 महिला गट आणि 2 मुलांचे गट अशा 18 गटांमध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत दिवस-रात्र खेळला जाणारा हा पहिला जिल्हास्तरीय सामना असून एकूण 28 रोमांचक सामने खेळवले जाणार आहेत. प्रत्येक सामना टेनिस बॉलचा 8 ओव्हरचा असेल आणि प्रत्येक संघात किमान 5 वरिष्ठ (40+) प्लेइंग 11 मध्ये असावेत. गंगाधाम मार्केटयार्ड येथील डाऊन टाऊन ग्राऊंड वर सर्व सामने होणार आहे.  विजेत्या संघाला सुवर्ण प्लेटेड ट्रॉफी आणि उपविजेत्या संघाला सिल्व्हर प्लेटेड ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक पुरस्कारही देण्यात येणार आहे.
आज झालेल्या पत्रकार परिषदेत 18 संघाची घोषणा करण्यात आली. यावेळी अध्यक्षः अनिल मित्तल, उपाध्यक्ष : दिनेश गुप्ता, नितीन अग्रवाल, अनिल अग्रवाल, रेणू अग्रवाल, प्रवीण गोयल, विकी गुप्ता, नरेंद्र मित्तल, संजय मित्तल, संदीप अग्रवाल उपस्थित होते. अनिल मित्तल पुढे म्हणाले की अग्रवाल समाजातील तरुणांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी युवा परिवर्तन हा अग्रवाल समाजाचा मुख्य अजेंडा बनवणे आवश्यक आहे अन्यथा दोन्ही पिढीमध्ये अंतर निर्माण होईल. चांगल्या समाजासाठी बंधुता, चांगले आरोग्य आणि तरुण परिवर्तनाचा ट्रेंड सेट करण्यासाठी या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.  तरुणांच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करून ते म्हणाले की, सध्याच्या तरुणांना कौटुंबिक आणि व्यवसायात अनेक आव्हानांचा सामना करावा लागत असल्याने त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणणे आणि हातात बॅट घेणे आवश्यक आहे. त्यासाठीच अग्रसेन क्रिकेट लीगचा घाट घातला आहे.