महानगरपालिकेतील एकवट मानधनावरील १४९ कर्मचारी कायमस्वरूपी रुजू !
पुणे महानगरपालिका मुख्य सभेमध्ये समाजविकास विभागामधील एकवट मानधनावरील सेवकांना पुणे मनपामध्ये कायम रुजू होण्यासाठीचा प्रस्ताव मान्य करुन घेत, प्रस्ताव अंतिम मंजुरीकरिता राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
आपल्या प्रयत्नातून हे शक्य होऊ शकले, याचे नक्कीच समाधान आहे. या सेवकांना पुणे मनपामध्ये कायम सेवेत रुजू होण्यासाठीचे आज्ञापत्र महापालिका आयुक्त यांच्या मान्यतेने पारीत करण्यात आले असून, सर्व १४९ सेवक पुणे मनपामध्ये रुजू झाले आहेत.
या सर्व कर्मचाऱ्यांनी आज माझी भेट घेऊन आभार व्यक्त केले. यावेळी सर्व सेवकांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.