महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कोळेवाडीत आरोग्य शिबिराचे आयोजन
क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त आदिवासीपाडा कोळेवाडी येथे ,युवा संवाद सामाजिक संस्थेच्यावतीने आणि ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात हिमोग्लोबिन,रक्तदाब ,रक्त घटक चाचणी ,मधुमेह,नेत्र तपासणी तसेच मोफत चष्मे वाटप आदींचा समावेश होता.
शिबिराचे उद्घाटन कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. गिरिराज सावंत, भाजपा युवा मोर्चाचे चिटणीस श्री. प्रवीण वनशिव,ऑरा मल्टीस्पेशालिटीच्या संचालिका डॉ.शीतल कल्याणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी श्री.प्रवीण वनशिव बोलताना म्हणाले की, महापुरुषांच्या जयंती उत्सव हा डीजे वर नाचून न करता त्यांचे विचार आचरणात आणून करायला हवी.तीच खरी त्यांची मानवंदना ठरेल.युवा संवाद सामाजिक संस्थेच्या उपक्रमाचे खरच कौतुक करायला हवे.
प्रमुख पाहुणे श्री.गिरिराज सावंत बोलताना म्हणाले की, महापुरुषांच्या विचारांची आता खऱ्या अर्थाने गरज आहे.जयंती दिवसाच्या झेंडे प्रेमावर दुसऱ्या दिवशी तितके प्रेम दिसत नाही.आधुनिक भारताच्या दिशेने वाटचाल करत असताना आज आदिवासीपाडा कोळेवाडी येथे आपण आरोग्य तपासणी शिबिराचे महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतो आहोत ही त्याचाच एक सुरुवात म्हणता येईल.महापुरुष आज जरी आले तरी लोक त्यांना बाजूला सारतील.आज लोक महापुरुष आणि त्यांच्या विचारांपेक्षा त्यांच्या फोटोला महत्व देत आहेत ही खेदजनक गोष्ट आहे.सर्वसामान्य जनतेला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही खरी काळाची गरज आहे.हीच खरी महापुरुषांची जयंतीची मानवंदना ठरेल.
डॉ.शीतल कल्याणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.आलेल्या पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक युवा संवाद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री.धनराज गरड यांनी केले.
मोफत आरोग्य तपासणीत दोनशे नागरिकांनी लाभ घेतला.यावेळी,आकाश कदम , प्रबुद्ध प्रक्षाळे ,रघुनाथ चोरघे,सुरेश धानवले,बाळासाहेब धोका ,अनिल रेळेकर, दामोदर शेलार ,रामदास सुर्यवंशी ,जेष्ठ नागरिक साधू शेलार यांचेसह आदिवासी पाडा कोळेवाडी युवक समितीचे पदाधिकारी ,ग्रामस्थ उपस्थित होते.