29/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

‘मन कस्तुरी रे’ आता अॅमोझॅान प्राईमवर

Share Post

नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मन कस्तुरी रे’ या चित्रपटाने प्रेक्षकांचे मन जिंकले. प्रत्येकासाठी प्रेमाची व्याख्या वेगवेगळी असते. प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची पद्धतही निराळी असते. मात्र या सगळ्यात संवाद महत्वाचा असतो. जर एकमेकांसोबत संवादच झाला नाही की त्याचे रूपांतर गैरसमजात होते आणि त्यानंतर काय होते हे आपल्याला संकेत माने दिग्दर्शित ‘मन कस्तुरी रे’ या चित्रपटात पाहायला मिळते. अभिनय बेर्डे, तेजस्वी प्रकाश यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ॲमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे. चित्रपटामध्ये भरपूर सस्पेन्स आणि ट्विस्ट पाहायला मिळत असून एकमेकांसाठीचा द्वेष, सूड भावनाही आहे. नितीन केणी यांच्या नेतृत्वाखाली, मुंबई मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत, व्यंकट अत्तिली, मृत्यूंजय किचंबरे यांच्या इमेन्स डायमेंशन एन्टरटेनमेंट ॲण्ड आर्ट्स निर्मित या चित्रपटाचे सहनिर्माते ड्रॅगन वॅाटर फिल्म्सचे निशीता केणी आणि करण कोंडे आहेत.