भूमी फाउंडेशनचा चतुर्थ वर्धापन दिन व सन्मान सोहळा उत्साहात साजरा
लोकसहभागातून सामाजिक कार्य करणारे भूमी फौंडेशनचे संस्थापक मा.कैलास पवार ह्यांनी चतुर्थ वर्धापन दिनी कवी संमेलनात सहभागी असणाऱ्या मुलांचा सत्कार केला, त्यामध्ये 12 वर्षीय साक्षी शिरोडे हिने स्वतः लिहिलेली कविता सादर केली होती त्याचे तिला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. अवघ्या 9 व्या वर्षांपासून कविता लिहिण्याचा छंद म्हणजे नवलच वाटते सगळ्यांना. तिला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.
सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल भूमी फौंडेशनचे प्रेरणास्थान म्हणून आहेत. कार्यक्रमामध्ये सावित्रीबाई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पराग काळकर, भारतीय हवाईदलाचे मा. पद्माकर बापट, रांका ज्वेलर्सचे संस्थापक फतेचांदजी रांका, मा. संतोष बारणे, मा. अमितकुमार दुबे,असे बरेच मान्यवर उपस्थित होते.