NEWS

भीमथडी जत्रेद्वारे परंपरा, रम्यता आणि सक्षमतेच्या भव्य सोहळ्यास शुभारंभ

Share Post

कृषी महाविद्यालयाच्या विस्तीर्ण पटांगणावर भरत असलेल्या भीमथडी जत्रा या बहुप्रतिक्षित वार्षिक सांस्कृतिक व कृषी महोत्सवाची सुरुवात झाली असून या विशाल सोहळ्याची भव्यता २१ डिसेंबर ते २५ डिसेंबर पर्यंत अनुभवता येणार आहे. २१ डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आलेल्या उद्घाटनसोहळ्याने या सांस्कृतिक वैभवाने नटलेल्या, सक्षमता आणि पुरोगामी दृष्टीकोनाचा हिरीरीने पुरस्कार करणाऱ्या या सात दिवसीय महोत्सवाचा शुभारंभ झाला,

सन्माननीय श्रीम. सुनंदा ताई पवार यांच्या पुढाकाराने संपन्न झालेल्या या उद्घाटनसोहळ्याला अनेक प्रतिष्ठित पाहुणे व समाजनेत्यांनी आपली उपस्थिती दर्शविली. बुद्धिमत्ता व सांस्कृतिक संवर्धनाच्या बीकन असलेल्या श्रीम. सुनंदा ताई पवार म्हणाल्या, “भीमथडी जत्रेमध्ये आपल्या श्रीमंत वारशाचे प्रतिबिंब दिसते, ज्याचा पडसाद आपल्या समुदायांच्या उत्साहाने सळसळणाऱ्या उर्मीमध्ये ऐकू येतो. हा उपक्रम म्हणजे केवळ एक उत्सव नाही तर काळाच्या कसोटीवर टिकून राहण्याची आपली क्षमता व पिढ्यानपिढ्यांपासून टिकून राहिलेल्या परंपरा अशा आपल्याला आपली ओळख मिळवून देणाऱ्या गोष्टींचे ते एक जिवंत उदाहरण आहे. भीमथडी जत्रा म्हणजे आपल्या कुशल कारागिरांच्या हातांनी विणलेल्या कहाण्यांचा एक असा गालिचा आहे, ज्यातून आपल्या स्व-मदत गटांच्या अदम्य उर्मीचे प्रदर्शन घडते. शुभारंभाचे दीपप्रज्वलन करून आपण सांस्कृतिक समरसता, सक्षमता आणि पर्यावरणाविषयीच्या सजगतेच्या वाटेवरून आपला प्रवास सुरू करू या. आपण एकत्रित आल्याने हा उपक्रम केवळ एक उपक्रम राहत नाही, तर या निमित्ताने आपण परंपरा, सुकोमलता या मूल्यांना अंगिकारत काळाच्या कक्षा ओलांडणारा व सर्वांसाठी एक अधिक उज्ज्वल आणि शाश्वत भविष्याचे वचन देणारा एक अनुभव निर्माण करतो.”

या उपक्रमाचे उद्घाटन विजयलक्ष्मी छात्रा, अश्विनी नारायण आणि श्वेताश्री मजुमदार यांच्याहस्ते झालेल्या मंगलमय दीपप्रज्वलनाने झाले, ज्यातून पुढील सोहळ्यासाठीचा मंच सिद्ध झाला. भीमथडी जत्रेच्या या शुभारंभाच्या दिवसाला एक वैशिष्ट्यपूर्ण आणि सांस्कृतिकदृष्ट्या लक्षणीय अशा एका पैलूची जोड देताना, भारतीय संस्कृतीच्या सांस्कृतिक पटामध्ये ज्याचे धागे अत्यंत खोलवर विणले गेले आहेत अशा साडी या आयकॉनिक वस्त्राभोवती गुंफलेले एक मनोवेधक चर्चासत्र आयोजित करण्यात आले, ज्यात विजयलक्ष्मी, अश्विनी आणि श्वेताश्री यांचा सहभाग होता. जागतिक साडी दिनी साडीच्या चाहत्यांना एकत्र आणणे तसेच या अभिजात पेहरावाच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्वाविषयी लोकांच्या मनात प्रशंसेची भावना व जाण अधिक खोलवर रुजविणे हे या खास उपक्रमाचे लक्ष्य होते. या चर्चेमध्ये भारतीय हातमाग उद्योगाच्या गुंतागुंतीच्या ताण्याचाण्यांवरही सखोल चर्चा झाली, ज्यात या समृद्ध परंपरेच्या संवर्धनासाठी टिकाऊ कापड व आधुनिक दृष्टिकोनाच्या आवश्यकतेवर भर देण्यात आला.

भीमथडी जत्रेमध्ये महिलांच्या स्व-मदत गटांना त्यांच्या प्रतिभेचे व उद्योजकता कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठीचा मंच उपलब्ध करून दिला जातो ही या उपक्रमासाठी मोठ्या अभिमानाची बाब आहे. या जत्रेमध्ये हे गट घरगुती बनावटीच्या वस्तूंची विक्री करतील, ज्यातून जत्रेला भेट देणा-यांना खरेदीचा आगळावेगळा अनुभव मिळेलच पण त्याचबरोबर स्थानिक कारागिर व महिला कारागिरांनाही आर्थिक आधारही मिळेल.

पर्यावरणीय उत्तरदायित्वाविषयीच्या आपली समर्पित भावना पत भीमथडी जत्रेला प्लास्टिकमुक्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या उपक्रमामध्ये पर्यावरणश्रेही सवयींना प्रोत्साहन दिले जाते, ज्यामुळे पाहुण्यांना शाश्वत जीवनशैली अंगिकारण्यास प्रोत्साहन मिळते. याच बांधिलकीचा एक भाग म्हणून या महोत्सवामध्ये शाश्वततेचे मूल्य पाळणारे अॅण्ड्स, वस्त्रे आणि अशा कितीतरी वस्तूंचे प्रदर्शन मांडले जाते व त्यातून पुनर्वापरक्षम पर्याय पुरविले जातात तसेच कचरा-मुक्त पर्यावरणाचाही पुरस्कार केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *