23/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

नागरिकांना आग प्रतिबंध यंत्रणेचे ज्ञान आवश्यक – विश्वास कुलकर्णी

Share Post

लोकांमध्ये आग प्रतिबंध आणि सुरक्षेच्या दृष्टीने जनजागृतीच्या उद्धेशाने फायर अँड सिक्युरिटी असोशिएशन ऑफ इंडीया (FSAI)पुणे चाप्टरच्या वतीने पुण्यामध्ये इंडियन फायर अँड सिक्युरिटी यात्रा म्हणजेच फायर आणि सिक्युरिटी या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. बॅंकींग क्षेत्रातील सुरक्षा आणि उपकरणे, हॉटेल, लॉजिंग, केटरिंग, महिला सुरक्षा, प्रवास आणि पर्यटन क्षेत्रातील अग्निसुरक्षा आव्हाने, आधुनिक काळातील महिलांची सुरक्षा, ई-वाहनांची सुरक्षिता इत्यादी विषयांवर चर्चासत्र यावेळी पार पडले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, सुवर्ण महोत्सव वर्षात पदार्पण करणारे व्हीके ग्रुप जे संस्थापक व जेष्ठ आर्कीटेक्ट विश्वास कुलकर्णी म्हणाले की, आगीच्या घटनांवेळी होणारे नुकसान टाळण्याबरोबरच नागरिकांना स्वत:च्या जीव वाचविण्यासाठी आग प्रतिबंध यंत्रणेचे ज्ञान आवश्यक आहे. नवीन इमारत बांधताना इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये अग्निसुरक्षेला प्राधान्य कमी देण्यात येत असल्याची खंत वाटते. वास्तूरचनाकारांनी अग्निसुरक्षेच्या दृष्टीने खबदारी घेण्याची गरज आहे.

यावेळी एफएसएआय राष्ट्रीय अध्यक्ष अजित राघवन, सुरेश मेनन, अग्निशमन अधिकारी पातरुडकर, एफएसएआय पुणे अध्यक्ष नितीन जोशी, सचिव अर्चना गव्हाणे, अजित यादव, अमोल उंबरजे, पूजा गायकवाड, दादासाहेब गायकवाड, सुजल शहा शेठ, शशांक कुलकर्णी, सिंपल जैन, आनंद गाडेकर, अनुजा करहू, शाश्वता जोशी, किशोर महेश आदी मान्यवर उपस्थित होते.

देशभरात अग्निसुरक्षा आणि संरक्षण प्रणालीच्या आत्याधुनिक तंत्रज्ञानास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने फायर सेक्युरिटी यात्रेचे आयोजन करण्यात येते. यावेळी अग्निसुरक्षा संबंधीत आव्हाने आणि संधी याविषयी अनेक तज्ञांचे व्याख्याने आयोजित केली जातात. या क्षेत्रातील अनेक नामवंत कंपन्यांच्या प्रतिनिधींनी यावेळी सहभाग घेत असतात.

रशीदा शब्बीर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, रोहित श्रीवास्तवा, महेश गव्हाणे, अरविंद मांडके, माधव जोशी, जॉन अब्राहम, आसमा शेख,श्वेता दरगड, अंशु शुक्ला, निलेश गांधी, डॉ त्रिशला राणे, तरुणेश माथूर, महेश लिमये, मिलिंद पनदारे, रवी नायर, समीर बुवा व डॉ दीपक शिकारपुर इ तज्ञ चर्चासत्रात सहभागी होते.

तसेच विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्राची ओळख होण्यासाठी व प्रगत तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी फायर अ‍ॅंड सिक्युरीटी असोशिएन ऑफ इंडिया (विद्यार्थी विभाग) व स्कुल ऑफ आर्किटेक्ट यांच्यात सामंजस्य करार या वेळी करण्यात आला. या करारामुळे विद्यार्थायांना शिक्षण सुरु असतानाच औद्योगिक क्षेत्राची ओळख होण्याबरोबर भविष्यात अधिक चांगल्या संधी उपलब्ध होणार आहेत.

या कार्यक्रमासाठी राणेंक्स, जीयेसटी, फायरटेक, लाईव्ह वायर, किर्लोस्कर ब्रदर्स, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, अल्फा ब्लोवर्स, मुप्रो, अरमासेल इत्यादी कंपन्यांनी विविध प्रायोजक म्हणून सहकार्य केले.