भारतात सुपरक्रॉस क्रांतीची सुरुवात करण्यासाठी पुण्यात सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग सज्ज
सीएट ही भारतातील आघाडीची टायर उत्पादक कंपनी आणि सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगची टायटल प्रायोजक असून आज कंपनीने पुण्यातील श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथील पहिल्या सीझनच्या पहिल्या रेसचा शुभारंभ केला. आयएसआरएलने कुशल आंतरराष्ट्रीय रायडर्सना एकत्र आणत वेगवेगळे विभाग आणि फॉरमॅट्समध्ये त्यांच्यात थरारक लढत घडवून आणली.
आयएसआरएलतर्फे प्रमुख शहरांत रेसच्या पुढच्या टप्प्याचे आयोजन केले जाणार असून ११ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे, तर दिल्ली येथे २५ फेब्रुवारी रोजी रेस होणार आहेत.
सीएट लिमिटेडचे प्रमुख विपणन अधिकारी श्री. लक्ष्मीनारायण म्हणाले, ‘इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगचे टायटल प्रायोजक असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. सुपरक्रॉसमधील सीएटचा सहभाग प्रायोजकत्वापुरता मर्यादित नाही. आम्ही गेल्या १० वर्षांपासून डर्ट बायकिंग क्षेत्रात सक्रिय असून कठीण भूभागांना आव्हाने देणारे खास टायर्स आम्ही तयार करतो. एंड्युरो ट्रॅक ट्रेनिंग प्रोग्रॅमसारखे आमचे उपक्रम महत्त्वाकांक्षी रायडर्सना सुपरक्रॉस चॅम्पियन बनण्यासाठी आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण देतात. आम्हाला विश्वास वाटतो, की सीएट आयएसआरएलमुळे भारतात या खेळाची पातळी उंचावेल आणि जागतिक दर्जाच्या मोटरस्पोर्ट क्रीडापटूंच्या विकासाला योगदान दिले जाईल.’
तरुणांच्या महत्त्वाकांक्षा आणि ध्यासाला पाठिंबा देणाऱ्या सीएटने कायमच मोटरस्पोर्ट्स तसेच इतर खेळांचा प्रसार करण्याची बांधिलकी जपली आहे. सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगचे टायटल प्रायोजकत्व भारताला सुपरक्रॉसच्या जागतिक मंचावर चालना देण्यासाठीची बांधिलकी दर्शवणारे आहे.