भाजपा वैद्यकीय आघाडी ( नॅचरोपॅथी विंग ) च्या वतीने ” संवाद भाजपाच्या मित्रांसोबत ” चा पुणे येथून भव्य शुभारंभ
भारतीय जनता पार्टी , वैद्यकीय आघाडी ( नॅचरोपॅथी विंग ) च्या वतीने महाराष्ट्राची सांस्कृतिक नगरी पुणे येथून संवाद भाजपाच्या मित्रांसोबत या कार्यक्रमाचा भव्य शुभारंभ वैद्यकीय आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक डॉ. अजित गोपछडे यांच्या शुभहस्ते पार पडला . त्याचसोबत धन्यवाद मोदीजी अभियाना अंतर्गत उपस्थित लोकांना मार्गदर्शन करण्यात आले व *नव मतदार नोंदणी , युवा वॉरीअर्स अभियान प्रारंभ झाला
भाजपा वैद्यकीय आघाडी चे महाराष्ट्र प्रदेश संयोजक डॉ. अजित गोपछडे व सहसंयोजक डॉ. बाळासाहेब हरपळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व मुख्य उपस्थितीमध्ये ओरॅकल इन्स्टिट्यूट , पुणे येथे संपन्न या भव्य कार्यक्रमाला डॉ. उज्वला हाके ( सहसंयोजक , भाजपा वैद्यकीय आघाडी ) , डॉ. धनंजय जोशी ( पुणे शहराध्यक्ष , भाजपा वैद्यकीय आघाडी ) , डॉ. संदीप बुटाला ( पुणे शहर उपाध्यक्ष, भाजपा वैद्यकीय आघाडी ) , डॉ. धर्मेंद्र शहा ( सल्लागार , पुणे शहर भाजपा वैद्यकीय आघाडी ) , डॉ. सुनिल चव्हाण ( प्रदेश संयोजक , भाजपा नॅचरोपॅथी विंग ) , डॉ. क्रांती कुमार महाजन ( प्रदेश सहसंयोजक , भाजपा नॅचरोपॅथी विंग ) , डॉ. मिलिंद सरदार ( प्रदेश सहसंयोजक , भाजपा नॅचरोपॅथी विंग ) यांची उपस्थिती लाभली . अशाप्रकारे संपन्न या भव्य कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ओरॅकल इन्स्टिट्यूटच्या संचालिका सौ. स्मिता चव्हाण , भाजपा नैचरोपैथी विंग च्या प्रदेश सहसंयोजक डॉ. सुकन्या साळवे , ओरॅकल इन्स्टिट्यूटचे सर्व विद्यार्थी , कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले .