Daily UpdatePune | NEWS

भाजपाचे बूथ विजय अभियान धीरज घाटे यांची माहिती

Share Post

भाजपाचे बूथ विजय अभियान धीरज घाटे यांची माहिती भाजपकडून शहरात जोरदार प्रचार यंत्रणा राबवली जात असून मोहोळ यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त ६ आणि ७ एप्रिल रोजी ‘घर चलो अभियान’ राबवण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून शहरातील जवळपास दहा ते बारा लाख मतदारांपर्यंत पोहोचण्याचा मेगा प्लॅन भाजपकडून आखण्यात आला आहे. या अभियानात भाजपाचे १० हजार पेक्षा जास्त कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

६ एप्रिलला भाजपचा ४४ वा वर्धापन दिन असून या दिवशी पुणे शहर भाजपकडून मोहोळ यांच्या प्रचारासाठी ३ लाख घरांमध्ये विशेष संपर्क मोहीम राबविण्यात येणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार प्रा. मेधा कुलकर्णी, सर्व आमदार यांच्यासह १० हजार पेक्षा जास्त कार्यकर्ते या अभियानात सहभागी होणार असल्याचे घाटे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

लोकसभा निवडणुकीत ”अब की बार ४०० पार” ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीने प्रत्येक बुथवर ३७० मते वाढविण्याचा निर्धार केला आहे, असेही घाटे यांनी सांगितले.घाटे म्हणाले, विधानसभा स्तरावर पक्षाच्या बूथस्तरीय कार्यकर्त्यांचे तसेच पन्ना प्रमुखांचे मेळावे या अभियानात आयोजित केले जाणार आहेत. मागील तीन निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीचा आढावा घेऊन यावेळच्या निवडणुकीसाठी मतदानाचे उद्दिष्ट निश्चित केले जाणार आहे. या अभियानात प्रत्येक बूथवर मागच्या निवडणुकीपेक्षा ३७० मते वाढवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. या अभियानात समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्य़ाचे लक्ष्य आहे.भाजपाचे बूथ विजय अभियान धीरज घाटे यांची माहिती