ब्लॅकबेरीज’च्या वतीने पुणे येथील दालनात हांगझू 2022 आशियाई पॅरा गेम्स’मधील भारतीय विजेत्यांचा सत्कार
ब्लॅकबेरीज, हा पुरुषांच्या कपड्यांचा महत्त्वाकांक्षी भारतीय ब्रँड असून वैश्विक भारतीयांच्या फॅशन गरजा लक्षात घेऊन सेवा उपलब्ध करून देतो. दिनांक 22-28 ऑक्टोबर 2023 दरम्यान हांगझू येथे नुकत्याच झालेल्या चौथ्या आशियाई पॅरा गेम्स 2022 मध्ये भारताने 111 पदके मिळवली असून ब्लॅकबेरीजच्या वतीने अभूतपूर्व विजय साजरा करण्यात आला.
‘कीप राइजिंग’च्या प्रेरणादायी मूल्यांचा स्वीकार करत, ब्लॅकबेरीला चौथ्या आशियाई पॅरा गेम्ससाठी ‘समारंभाचे अधिकृत भागीदार’ म्हणून पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया (पीसीआय) सोबतच्या भागीदारीबद्दल प्रचंड अभिमान वाटतो.

ब्लॅकबेरीज आणि पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया (पीसीआय) हे ‘समारंभाचे अधिकृत भागीदार’ बनले आणि या भव्य सोहळ्यात भारतीय पथकाची पाठराखण केली. ब्लॅकबेरीजचे सार पॅरा-अॅथलिटच्या अतूट भावनेला प्रतिबिंबित करते. हे खेळाडू प्रतिकूल परिस्थितींवर मात करत सातत्याने सीमा मोडून आहेत. भारतीय तुकडीसाठी समारंभाचे पोशाख तयार करणे हा आमच्यादृष्टीने महत्त्वाकांक्षी क्षण होता. आमची ही भागीदारी एक पाऊल पुढे नेत, जवळपास 29 सुवर्ण, 31 रौप्य आणि 51 कांस्य अशी राष्ट्रासाठी एकत्रितपणे 111 पदके जिंकणाऱ्या सर्व विजेत्यांचा सत्कार या ब्रँडच्या वतीने करण्यात आला.
“आम्हाला या विजेत्यांचा सार्थ अभिमान वाटतो, त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत विजयश्री खेचून आणली आणि देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवत वैभवात भर घालत आहेत. सर्व बिकट परिस्थितींविरुद्ध जाऊन यशस्वी होण्यासाठी या खेळाडूंचे कठोर परिश्रम, दृढनिश्चय आणि अतूट वृत्तीबद्दल त्यांनी जगभरातील लोकांकडून आदर मिळवला आणि प्रशंसेस पात्र ठरले आहेत. आम्ही खेळाडूंच्या कर्तृत्वाचे कौतुक करतो. दृढनिश्चय आणि लवचिकतेच्या विजयाचे प्रतीक असलेल्या या खेळाडूंचा विलक्षण प्रवास साजरा करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. या प्रवासात त्यांच्याबरोबर सहभागी होणे हा ब्लॅकबेरीजसाठी एक परिपूर्ण सन्मान आहे,” असे उदगार ब्लॅकबेरीज’चे सह-संस्थापक आणि संचालक नीतिन मोहन यांनी काढले.
प्रतिष्ठित भारतीय कपड्यांचा ब्रँड नाविन्यपूर्ण, स्टायलिश आणि उत्कृष्ट शिलाई श्रेणीतील पुरुषांच्या कपड्यांच्या निर्दोष गुणवत्तेसाठी ओळखला जातो.
