बोपोडीत कन्यारत्नाचे पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मिरवणुकी द्वारे स्वागत
कुटुंबात जन्मलेल्या कन्यारत्नाचे ”मेरे घर आयी एक नन्हीं परी” असे म्हणत ग्रँड स्वागत करण्याचा ट्रेंड सध्या शहर व परिसरात रुजत आहे. लक्ष्मीच्या रूपाने चिमुकली घरात पहिलं पाऊल टाकताना एखाद्या सणाप्रमाणे आनंद सोहळा साजरा केला जात असल्याचे सध्या दिसून येत आहे. यातून एकप्रकारे ”बेटी बचाव”चा संदेश दिला जात आहे. हाच संदेश बोपोडीतही पाहण्यास मिळाला एका नवं बालिकेचे आगमन अगदी वाजत गाजत मिरवणूक काढून फटाके वाजवीत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नववर्षात घरी स्वागत करण्यात आले. बोपोडी भागातील पुणे मेट्रोचे पत्रकार मंगेश गायकवाड यांच्या घरी तिसर्या पिढी नंतर कन्यारत्न झाले असून आजोबा मंगेश किसन गायकवाड यांनी जलोषात नातीचे स्वागत केले.कन्यारत्नाचे घरी येताच घरातील सुवासिनी कन्येसह तिच्या आईला औक्षण केले. कन्यारत्न येणार्या मार्गावर फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. यासह घराला सुंदर सजावट केले होेते. लक्ष्मीच्या रूपाने चिमुकली आपल्या घरी आली, या भावनेने तिची पाऊलं कुंकवाच्या पाण्यात भिजवून घरात उमटविली गेली. त्यानंतर देवघरात दर्श घेऊन चिमुकलीला आकर्षक फुलांनी सजविलेल्या पाळण्यात ठेवण्यात आलेसर्व कुटुंबीय एकत्र येत फटाक्याची आतषबाजी, फोटो शूट, शुभेच्छा देत हा कन्यारत्न स्वागत आणि गुढीपाडव्याचा आनंद सोहळा साजरा करण्यात आला.आजोबा मंगेश गायकवाड यांनी एक आगळा संदेश देत मुलगी वाचावा हा प्रयोग प्रत्यक्ष रित्या आमलात आणला आणि जल्लोषात मुलीचे म्हणजे आपल्या नातीचे वाजत गाजत स्वागत केले. या समाज उपयोगी उपक्रमाला प्रत्यक्षात आमलात आणल्या बद्दल बोपोडीतील सामाजिक चळवळीत कार्य करणार्या सम्राट विचार मंच च्या वतीने जेष्ठ मार्गदर्शक बी एम कांबळे दादा यांच्या हस्ते मुलीच्या मातेचा आणि कुटुंबाचा पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी मंचाचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार दत्ता सूर्यवंशी, ओडीटर ऍड. विठ्ठल आरुडे, ऍड. योगराज पिल्ले, मातंग युवा आघाडीचे अध्यक्ष अंकुश साठे, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत भाऊ ओव्हाळ, राजेंद्र पालांडे, राजेश कांबळे, मुलीची आई अर्चना गायकवाड आणि वडील कुणाल गायकवाड,अमित शहा इत्यादी मान्यवर उपस्थित होते. गायकवाड यांच्या या कर्तृत्वामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.