29/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

बालगंधर्व रंगमंदिरचा ५५ वा वर्धापन दिन सोहळा २६ जून ते २८ जून दरम्यान

Share Post

बालगंधर्व रंगमंदिर हे सर्व कलाकारांचे श्रद्धास्थान तसेच रसिकांचे आदराचे स्थान आहे. दरवर्षी या वास्तूचा वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. यावर्षी बालगंधर्व परिवार च्या माध्यमातून सर्व कलाकार मिळून ५५ वा वर्धापन दिन सोहळा भव्य दिव्य स्वरुपात साजरा करीत आहोत.

दि. २६ जून २०२३ रोजी सकाळी १० वा. नांदी आणि गणेशवंदनेने ह्या महोत्सवाची सुरुवात होणार आहे. सायं. ४ वाजता मा.ना. उदयजी सामंत, उद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा विश्वस्त, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबई यांच्या शुभहस्ते उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यादरम्यान ज्येष्ठ सिने-नाट्य अभिनेत्री मा. आशाताई काळे यांना यंदाच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

उद्घाटन सोहळ्यानंतर दि. २६/२७/२८ जून २०२३ या तीनही दिवशी विविध कलात्मक कार्यक्रमांची दिवसभर रेलचेल आहे. यामध्ये प्रामुख्याने जादूचे प्रयोग, महाराष्ट्राची लोकधारा, चांडाळ चौकडीच्या करामती, प्रसिद्ध अभिनेते मा. समीर चौगुले यांची मुलाखत, मनिषा लताड प्रस्तूत हिटस् ऑफ लता मंगेशकर व आर. डी. बर्मन संगीत रजनी, पारंपारिक भारूड, महिलांसाठी मंगळागौर, फक्त महिलांसाठी लावणी महोत्सव, शाहीर दादा कोंडके यांच्या ढंगात ‘दादांची आठवण आली का’, द इन्स्ट्रुमेंटल आर.डी., तसेच चर्चासत्रात थेट भेट नाट्य-चित्रपट अभिनेते मा. श्री. प्रशांत दामले यांच्याशी मा. सौमित्र पोटे यांनी साधलेला संवाद आणि यावर्षी पहिल्यांदाच मास्टर जयसिंग पाचेगांवकर सह लता-लंका पाचेगांवकर यांच्या लोकनाट्य तमाशाचे सादरीकरण होणार आहे. त्याचबरोबर बालगंधर्व परिवाराची आनंदवारी-गंधर्वदारी हा भक्तीगीत व भावगीतांचा कार्यक्रम, बालनाटिका जिर्णोद्धार, प्रसिद्ध व्याख्याते मा. डॉ. श्रीमंत कोकाटे सर यांचे ‘शिवचरित्रातून काय शिकावे’ या विषयावर व्याख्यान, महाराष्ट्रात गाजत असलेल्या लोकगीतांचा कार्यक्रम ‘आवाज महाराष्ट्राचा’ लोकप्रिय गायिका राधा खुडे आणि सहभागी कलाकार त्यानंतर पारंपारिक जागरण गोंधळ सादरकर्ते महागायक चंदन कांबळे, शा. विलास अटक, मिरा दळवी, प्रदिप कांबळे त्यानंतर द रील स्टार शो, त्याचबरोबर प्रा. अशोक देशमुख यांचा ‘हसत खेळत तणावमुक्त जीवन’ हा कार्यक्रम आणि विशेष साधक बाधक चर्चा ‘इतिहासपटांची मायंदाळी : इतिहासाचं प्रेम की व्यवसायाचं गणित?’ सहभाग दिग्गज लेखक श्री. विश्वास पाटील, ज्येष्ठ पत्रकार श्री. दिलीप ठाकूर, निर्माते श्री. शशिकांत पवार, दिग्दर्शक व वितरक श्री. अनुप जगदाळे हे उपस्थित राहणार असून सूत्रसंचालन मा. राज काझी करतील. याचबरोबर रात्री डेस्टिनी द बॅण्ड संदीप पाटील प्रस्तूत हिटस् ऑफ कुमार शानू संगीत रजनी संपन्न होणार आहे. दि. २६/२७/२८ जून तीनही दिवस विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. दि. २८ जून २०२३ रोजी सायं. ४ वा. मा. ना. चंद्रकांतदादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, पुणे जिल्हा यांचे हस्ते पुरस्कार वितरण व बालगंधर्व रंगमंदिराच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त तब्बल ५५ किलो चा केक कापून सांगता समारोह संपन्न होणार आहे.

या महोत्सवाची संपूर्ण महाराष्ट्रातील रसिक आणि कलाकार आतुरतेने वाट पहात असतात. प्रत्येक लहान थोर कलाकार हा सेवाभावनेने कुठलंही मानधन न घेता हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी झटत असतो. सदर कार्यक्रमास तीनही दिवस उपस्थित राहून आपल्या दैनिकामध्ये प्रसिद्धी देण्यात यावी ही सर्वांच्या वतीने नम्र विनंती.

पुरस्काराचे नाव व मान्यवर
१)जीवन गौरव – मा. आशाताई काळे
२)संगीत नाटक- मा. वर्षा जोगळेकर
३)कला उद्योजक – मा. डॉ संतोष चव्हाण
४))बुकींग क्लार्क – मा. अमित मांडवकर

नाटक विभाग
५)मा. मंगलदास माने (अभिनेता)
६)मा. अंजली पटवर्धन (अभिनेत्री)
७)मा. देवेंद्र भिडे (अभिनेता -बालनाटय विभाग)
८)मा. संतोष गायकवाड (नेपथ्य)

बालगंधर्व कार्यालय –
९)मा. बाळू सदाशिव गायकवाड- कार्यलय क्लार्क
१०)मा. अमित शिंदे – सुरक्षारक्षक
११)मा. हरिश्चंद्र किसन शिंदे – शिपाई
१२)मा. सौ. सुनिता पवार – माळीणताई
१३)मा. सनी लोणारे रंगमंच व्यवस्था –
१४)मा. विनिता पिंपळखरे-उपाध्ये – लेखन नाटय विभाग
१५)मा. सुयश झुंझुरके – दिग्दर्शक नाटय विभाग
१६) मा. भूजंग वाघ – जादूगार विभाग
१७) मा. कल्पना देशपांडे – एकपात्री विभाग

ध्वनी व्यवस्था
१८) मा. हेमंत उत्तेकर – युवा ध्वनी संयोजक
१९) मा. राम तेलंग – ज्येष्ठ ध्वनी संयोजक

प्रकाश योजना-
२० ) मा. मुकुंद डिंबळे – जेष्ठ प्रकाश योजनाकार
२१) मा. विजय गाडवे – युवा प्रकाश योजनाकार

लोकधारा विभाग-
२२) मा. विलास मडके – निर्माता
२३) मा. महेश भांबीड – नृत्य दिग्दर्शक
२४) मा भारती पाटोळे -ज्येष्ठ नृत्यांगणा
२५) मा. पूजा शिंदे -युवा नृत्यांगणा
२६) मा. नरेंद्र लाड – नृत्य कलाकार
२७) मा. संदीप धर्माधिकारी जेष्ठ गायक
२८) मा. प्रशांत धिवार युवा गायक
२९) मा. तेजस्वीनी लोकरे – गायिका
३०) मा. लक्ष्मीकांत (दादा) साळवे – निवेदक
३१) मा. प्रमोद कांबळे – ढोलकी सम्राट
३२) मा. नितीन कांबळे- कि बोर्ड वादक
३३) मा. दशरथ पाचारणे बतावणी विभाग

लावणी विभाग –
३४) मा. सुरेखाताई पुणेकर निर्माती
३५) मा. महेंद्र बनसोडे

नृत्य दिग्दर्शक-
३६) मा. रुही संगमनेरकर – ज्येष्ठ नृत्यांगणा
३७) मा. सीमा पटेल – युवा नृत्यांगणा
३८) मा. पूजा निरभवणे (सूर्यवंशी) – युवा नृत्यांगणा
३९) मा. सुधाकर पोटे निवेदक
४०) मा. राजेश विधाते – ढोलकी सम्राट
४१) मा. रवि जाधव – कि बोर्ड वादक
४२) मा. सचिन खंडागळे – अॅक्टोपॅडवादक
४३) मा. गायत्री कद्रेकर – गायिका

जेष्ठ तमाशा कलावंत –
४४) मा. काळूराम चिमाजी कांबळे
४५) मा. संभाजी रामभाऊ कोल्हे
४६) मा. छबूताई महादेव लाखे
४७) मा. राहूल शिंदे -लोकसंगित गायक

ऑर्केस्ट्रा विभाग-
४८) मा. मोहम्मद रफी शेख जेष्ठ गायक
४९) मा. लता म्हात्रे -सोनवणे -गायिका
५०) मा. नितीन शिंदे – रिदमवादक
५१) मा. प्रथमेश मोरे – मेलेडीवादक
५२) मा. डॉ. अमित त्रिभूवन -निवेदक
५३) मा. अश्विनी मोरे – वेशभूषा