23/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

बार्बेक्यु नेशनचे हिंजवडी येथे नवीन आऊटलेट

बार्बेक्यु नेशनचे हिंजवडी येथे नवीन आऊटलेट

Share Post

बार्बेक्यु नेशन तर्फे पुण्यातील हिंजवडी येथे नवीन आऊटलेटची सुरुवात केली. ७००० चौरस फूटांवर पसरलेल्या या आऊटलेट मध्ये १६४ लोक बसू शकतात. कॉर्पोरेट कार्यक्रम आणि पारिवारीक समारंभांसाठी आता हे एक योग्य स्थळ बनले आहे. या आऊटलेट ची अंतर्गत सजावट ही आकर्षक आणि ट्रेन्डी करण्यात आली आहे.

यावेळी बोलतांना बार्बेक्यु नेशन हॉस्पिटॅलिटी लिमिटेड चे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री फैज अझीम यांनी सांगितले “हिंजवडी येथे नवीन आऊटलेट सुरू करतांना आंम्हाला आनंद होत आहे. या आऊटलेट मधील आनंदी वातावरण पाहुण्यांना नक्कीच आवडेल. आम्ही आमच्या आदरातिथ्यासाठी प्रसिध्द आहोत आणि आंम्हाला खात्री आहे की पाहुण्यांना सुध्दा हे वातावरण आवडेल.”

बार्बेक्यु नेशनचे हिंजवडी येथे नवीन आऊटलेट

दि इट ऑल यू कॅन बुफे पध्दती नुसार बार्बेक्यू नेशन कडून शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची रेलचेल उपलब्ध करुन देण्यात येते. मांसाहारी स्टार्टर्स मध्ये प्रसिध्द मेक्सिकन चिली गार्लिक फिश, हॉट गार्लिक चिकन विंग्ज, तंदूरी तंगडी, काजून सीक कबाब, कोस्टल बार्बेक्यू प्रॉन्स आणि अशा अनेक पदार्थांचा समावेश असून शाकाहारी स्टार्टर्स् मध्ये तोंडाला पाणी सूटेल असे कुटी मिर्च का पनीर टिक्का, वॉक टॉस्ड सीक कबाब, शबनम के मोती मशरुम, पुरी कबाब आणि हनी सीसम सिनमॉन पायनॅपल तसेच अन्य पदार्थ उपलब्ध असतील. मांसाहारी पदार्थांच्या मेन कोर्स मध्ये चिकन दम बिर्याणी, राजस्थानी लाल मांस आणि दम का मुर्ग, तर शाकाहारी पदार्थांमध्ये पनीर बटर मसाला, मेथी मटर मलाई, दाल ए दम आणि व्हेज दम बिर्याणी यांचा समावेश आहे. लाईव्ह काऊंटर वर विविध शाकाहारी/मांसाहारी पर्याय असून यांत चिली क्रिस्पी पुरी, पालक चाट, मार्गारेटा पिझ्झा, खीमा पाव आणि चिकन शीक यांचा समावेश आहे. तर डेझर्ट मध्ये चॉकलेट ब्राऊनी, रेड वेल्व्हेट पेस्ट्रीज, अंगुरी गुलाबजामुन, केसरी फिरनी आणि असे अनेक पदार्थ आहेत. विविध प्रकारच्या कुल्फी ही या रेस्तराँ मध्ये असून त्यामुळे पाहुण्यांच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल. कुल्फी मध्ये अनेक विविध स्वाद जोडून अनेक आवडीच्या डेझर्टची निर्मिती करण्यात आली आहे.

बार्बेक्यु नेशनचे हिंजवडी येथे नवीन आऊटलेट

https://marathi.abplive.com/sports/world-cup/team-india-squad-for-icc-mens-t20-world-cup-2022-check-full-list-here-jasprit-bumrah-reutrnes-1099440