बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील फॅशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांचा भव्य फॅशन शो संपन्न
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील फॅशन टेक्नॉलॉजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्त्र आणि डिझाइन्स चा भव्य फॅशन शो आज पार पडला. सामान्य घरातून आलेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील फॅशन शो चा अनुभव देणे आणि त्यांना फॅशन, वस्त्र, डिझाईन क्षेत्रातील दिग्गजांशी संवाद साधता यावा यासाठी महाविद्यालयाने स्वखर्चातून विद्यार्थ्यांसाठी हा फॅशन शो आयोजित केला होता.
हॉटेल ऑर्किड,बालेवाडी येथे संपन्न झालेल्या या फॅशन शो प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र – कुलगुरू पराग काळकर, डॉ दीपक माने, विठ्ठल नाना काटे,अतुल शितोळे, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव ॲड संदीप कदम, खजिनदार डॉ. मोहनराव देशमुख, सहसचिव एल. एम. जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एन. झावरे , फॅशन टेक्नॉलॉजी विभागाच्या प्रमुख दीपाली जोशी आदि मान्यवर उपस्थित होते.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य कुटुंबातून संस्थेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. बहुजन हिताय -बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य घेऊन संस्था कार्यरत आहे, त्याच उपक्रमांचा भाग म्हणून संस्थेतील २०१४ साली स्थापन झालेल्या फॅशन टेक्नॉलॉजी विभागाच्या वतीने त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी ऑर्किड या पंचतारांकित हॉटेल मध्ये या शोचे आयोजन केले होते, यामध्ये ३५ विद्यार्थी सहभागी झाले होते, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क या शो साठी घेण्यात आले नाही हे या उपक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्ये आहे. असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एन. झावरे आणि फॅशन टेक्नॉलॉजी विभागाच्या प्रमुख दीपाली जोशी यांनी सांगितले.
या फॅशन शोच्या यशस्वीतेसाठी फॅशन टेक्नॉलॉजी विभागाच्या शिक्षिका प्रीती जोशी, अनुष्का जगदाळे, श्रद्धा महिंद्रकर, वीणा करंडे यांनी प्रयत्न केले.तर या फॅशन ची कोरिओग्राफी पुण्याचे पॅड मॅन,अभिनेते,दिग्दर्शक योगेश पवार यांनी केली आहे. आणि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर जे बंड्या यांनी केले. या फॅशन शो ला सहभागी विद्यार्थ्यांच्या पालकांची उपस्थिती लक्षणीय होती.
फॅशन शो स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
सर्वोत्कृष्ट डिझायनर – गटाचे नाव – पूर्वपार
1- फरीन शेख
२- प्रार्थना पवार
3- अंजली विश्वकर्मा
4- अमृता मसाने
5- वैष्णवी पांढरे
6- कोमल शेळके
सर्वोत्कृष्ट कलेक्शन – महिता
1.खुशाबू संजय गजबी
2.प्रियांका गौतम कांबळे
3.पूजा रवींद्र मद्दनवार
4.गौतमी प्रविण आवतारे
सर्वोत्कृष्ट नाविन्यपूर्ण कलेक्शन :- रनवे रफल्स
1.विशाखा धोंडगे
2.संपदा पाटील
3.पूजा पासलकर