बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे शहर क्षेत्र यांच्यातर्फे ग्राहक संपर्क मेळावा
बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे शहर विभाग यांच्यातर्फे ग्राहक संपर्क मेळावा दि. ७/०२/२०२३ रोजी पी.वाय.सी. हिंदू जिमख़ाना येथे आयोजित करण्यात आला. या मेळाव्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राच्या २०० हून अधिक खातेदारांनी आपला सहभाग नोंदविला. या मेळाव्यामध्ये १७०.११ कोटी रु. इतक्या रकमेच्या कर्ज मंजूरीपत्रे लघु, सूक्ष्म व मध्यम इ. क्षेत्रासाठी देण्यात आली. तसेच या अभियानाअंतर्गत १४९६ नवीन बचत खाती, ४०७ सरकारी विभागांची खाती, ७५३ खाती सामाजिक सुरक्षा योजेनेअंतर्गत उघडण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्षपद मा. आशीष पांडेय, कार्यकारी संचालक, बँक ऑफ महाराष्ट्र यांनी भूषविले. तसेच या कार्यक्रमासाठी बँकेचे पुणे शहर विभागप्रमुख महाव्यवस्थापक श्री राजेश सिंग, उप विभागप्रमुख श्री प्रशांत दास, पुणे पूर्व विभागाचे प्रमुख श्री जावेद मोहनवी, पुणे पश्चिम विभागाचे प्रमुख श्री राहुल वाघमारे तसेच पुणे शहरातील सर्व शाखांचे शाखाप्रमुख उपस्थित होते. मेळाव्यात ग्राहकांशी संवाद साधताना श्री आशीष पांडेय यांनी अशाप्रकारचे मेळावे आयोजित करण्याची गरज समजावून सांगितली तसेच अशाप्रकारचे १०० मेळावे संपूर्ण देशभरात या आर्थिक वर्षामध्ये आयोजित केल्याचे संगीतले. या मेळाव्याचे उद्दिष्ट म्हणजे ग्राहकांच्या गरजा जाणून घेणे व त्यांना बँकिंगसेवेदवारे जोडले जाणे होय.चालू आर्थिक वर्षाच्या तिसरया तिमाहीतील नेत्रदिपक कामगिरीबद्दल त्यांनी ग्राहकांना अवगत केले. बँकेने या काळात रु.७७५ कोटी इतका नफा कमाविला व सकल अनर्जक आस्ति (Net NPA) चे प्रमाण १% हून कमी करण्यात यशस्वी झाल्याचे नमूद केले. ग्राहकांच्या उत्तम प्रतिसादामुळे बँक सर्वच क्षेत्रात अत्यंत वेगाने व यशस्वीपणे घोडदौड करीत आहे.बँक ग्राहकांना अपेक्षित असलेली नवीन नवीन उत्पादने बँकेने कशाप्रकारे अमलात आणावयास सुरुवात केली आहे हेही यावेळी नमूद करण्यात आले.श्री आशीष पांडेय यांनी पुढे संगीतले की बँकेची आर्थिक तंत्रज्ञानाशी निगडीत स्वतःची अशी एक योजना असून त्याअंतर्गत खूप मोठ्या प्रमाणावर बँकिंग व्यवहार होत आहेत. बँकेने नव्याने सुरु केलेल्या व्हीडीओ केवायसी, डिजीटल कर्ज मंजूरी, कागदपत्रांची पूर्तता तसेच ऋण वितरण प्रणाली ई. ची माहीती या प्रसंगी देण्यात आली. रिटेल कर्ज प्रकारात बँकेचा व्याज दर हा संपूर्ण बँकिंग उद्योगात सर्वात कमी आहे.श्री राजेश सिंग, विभागप्रमुख , पुणे शहर विभाग यांनी स्वागतपर भाषण केले. सदर कार्यक्रमाचे अत्यंत काटेकोर व सुंदर नियोजन श्रीमती कुसुम केजरीवाल व श्रीमती नीलांजना मित्रा यांनी केले.श्री सुमित कुमार, सहायक महाप्रबंधक यांनी आभार प्रदर्शन केले.उपस्थित सर्व ग्राहकांनी बँकेचे आभार मानले. तसेच काही मौलिक सूचनाही दिल्या.