बँक ऑफ महाराष्ट्रला राजभाषेचा सर्वोच्च सन्मान ‘कीर्ती पुरस्कार’
बँक ऑफ महाराष्ट्र ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक आहे. बँक ऑफ महाराष्ट्रला राजभाषा हिंदीच्या संवर्धनासाठी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल भारत सरकारच्या गृह मंत्रालयातर्फे राजभाषेचा सर्वोच्च सन्मान “कीर्ती पुरस्कार” प्रदान करण्यात आला. यावर्षी बँकेला “श्रेष्ठ गृह पत्रिका” आणि “श्रेष्ठ राजभाषा अंमलबजावणी” या दोन श्रेणींमध्ये हा पुरस्कार मिळाला. हे पुरस्कार 14 सप्टेंबर 2023 रोजी पुणे, महाराष्ट्र येथे आयोजित भव्य हिंदी दिन समारोहामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रला प्रदान करण्यात आले.
गृह राज्यमंत्री श्री अजय कुमार मिश्रा यांच्या हस्ते, बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री ए. एस. राजीव यांना “श्रेष्ठ गृह पत्रिका” साठी प्रथम आणि “श्रेष्ठ राजभाषा अंमलबजावणी” साठी दुसरे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी मंचावर, राज्यसभेचे माननीय उपसभापती श्री हरिवंश नारायण सिंह, गृह मंत्रालयाच्या सचिव (राजभाषा) सुश्री अंशुली आर्य तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री सुश्री भारती पवार आदी देखील उपस्थित होते.
या कार्यक्रमात बँक ऑफ महाराष्ट्रचे श्री ए. बी. विजयकुमार, कार्यकारी संचालक आणि श्री आशीष पाण्डेय, कार्यकारी संचालक, श्री अमित श्रीवास्तव, सीवीओ, श्री के. राजेश कुमार, महाव्यवस्थापक आणि डॉ. राजेन्द्र श्रीवास्तव, उपमहाव्यवस्थापक (राजभाषा) आणि इतर प्राधिकारी देखिल उपस्थित होते.
यावेळी देशभरातील विविध सरकारी कार्यालये, उपक्रम आणि बँकांचे उच्च प्राधिकारी आणि राजभाषा अधिकारीही या समारंभात उपस्थित होते.
