फर्ग्युसन महाविद्यालयात 16 ते 24 डिसेंबर दरम्यान ‘पुणे पुस्तक महोत्सव’
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर 16 ते 24 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या ‘पुणे पुस्तक महोत्सवा’मध्ये अधिकाधिक लोकसहभाग वाढावा या उद्देशाने ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यांना अभिवादन, ‘शांतता पुणेकर वाचत आहेत’, ‘ज्ञान सरिता ग्रंथदिंडी’,आणि ‘टॅलेंट हंट’ या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, डीईएस चे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, फर्ग्युसनचे प्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र शासन, पुणे महानगरपालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, फर्ग्युसन महाविद्यालय या महोत्सवाचे सह-आयोजक आहेत. पुणे श्रमिक पत्रकार संघ, भारतीय विचार साधना, इस्कॉन हे सह – प्रायोजक आहेत.