“फक्त विनोदी भूमिकांना नाही तर सर्व प्रकारच्या भूमिकांना टायमिंगची गरज असते”: अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी
आपल्या नवीन चित्रपट जोगिरा सा रा रा च्या प्रमोशनसाठी स्टारकास्ट नवाजुद्दीन सिद्दीकी, नेहा शर्मा, महाक्षय चक्रवर्ती यांच्यासह दिग्दर्शक कुशन नंदी, निर्माता नईम ए. सिद्दीकी, क्रिएटिव्ह निर्माता किरण श्याम श्रॉफ आणि लेखक गालिब असद भोपाली पुण्यात उपस्थित होते. हा चित्रपट २६ मे रोजी प्रदर्शित होत आहे.
या चित्रपटाविषयी अधिक माहिती देताना नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाले, “हा माझ्यासाठी खूप वेगळा चित्रपट आहे. माझ्या रंगामुळे मी सामान्यत: डार्क चित्रपटांसाठी ओळखले जातो, परंतु हा चित्रपट अतिशय हलका आणि मनोरंजक आहे जो संपूर्ण कुटुंबासह पाहिला जाऊ शकतो. इंडस्ट्रीत येऊन मला २० वर्षे झाली आहेत आणि मला आता एकसारख्या भूमिका न करता विविध प्रकारच्या भूमिका साकारायच्या आहेत.
यावेळी बोलताना अभिनेत्री नेहा शर्मा म्हणाली, नवाजुद्दीन सिद्दीकी हे स्वता एक अॅक्टिंग स्कूल आहे त्यामुळे त्यांच्या सोबत काम करताना खूप काही शिकायला मिळाले. या चित्रपटाचा मी एक भाग आहे याचा मला आनंद आहे.मी चित्रपटाचे चित्रीकरण खूप एन्जॉय केले आणि एखाद्या कलाकारासाठी ते खूप महत्वाचे असते.
हा चित्रपट २६ मे रोजी प्रदर्शित होत आहे . या चित्रपटाची कथा एका जोडप्याभोवती फिरते, ज्याने आपापल्या कुटुंबाच्या दबावाला न जुमानता लग्न करण्याचा निर्धार केला आहे.
या चित्रपटाला संगीतबद्ध तनिष्क बागची, मीट ब्रदर्स आणि हितेश मोदर यांनी केले आहे . तसेच जरीना वहाब आणि संजय मिश्रा सहाय्यक भूमिकेत आहेत