प्रेरणा देण्यासाठी पुरस्कार देणे महत्वाचे : डॉ. सदानंद मोरे
समाजात विविध सेवा देणारे घटक महत्वाचे असतात, त्यात शिक्षकांचे स्थान महत्वपुर्ण आहे, समाजातील अन्य घटकांना प्रेरणा देण्यासाठी अश्याप्रकारचे पुरस्कार सोहळे आयोजित करणे महत्वाचे आहेत. पुरस्कार सोहळ्यामुळे जे चांगले काम करतात त्यांचा सन्मान होतो आणि इतरांना प्रेरणा मिळते असे मत संतसाहित्याचे गाढे अभ्यासक, 88 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – घुमानचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
छत्रपती युवा संघ व लिटमस फाऊंडेशन तर्फे आयोजित आदर्श सेवा व आदर्श शिक्षक पुरस्कार 2023 चे वितरण प्रसंगी डॉ. सदानंद मोरे बोलत होते.
आदर्श सेवा व आदर्श शिक्षक पुरस्कार 2023 चे वितरण सोहळा मा. डॉ. सदानंद मोरे (अध्यक्ष: 88 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – घुमान) यांच्या हस्ते , .श्री. अभिमन्यू काळे ( आयुक्त, अन्न व औषध प्रशासन ), डॉ. अभिजीत वैद्य (राष्ट्रिय अध्यक्ष: आरोग्य सेना) श्री. संजय आवटे (ज्येष्ठ पत्रकार), डॉ. श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक ), डॉ. प्रतापसिंह पाटील (सामाजिक कार्यकर्ते) यांच्या उपस्थितीत पुणे विद्यार्थी गृह ऑडिटोरियम, मुक्तांगण इंग्लिश मीडियम स्कूल, शिवदर्शन रोड सहकारनगर पर्वती पायथा, पुणे 411037 येथे प्रदान करण्यात आला.
किरण शिर्के (युवा उद्योजक पुरस्कार), पै. अभिजीत कटके (युवा क्रीडा पुरस्कार), विराज परदेशी (युवा क्रीडा पुरस्कार), नितीन जाधवराव (युवा क्रीडा पुरस्कार), सागर पायगुडे (युवा उद्योजक पुरस्कार), आमदार रविंद्र धंगेकर (आदर्श सेवा गौरव पुरस्कार), विजय पाटील (आदर्श सेवा गौरव पुरस्कार), शिवदास सर्ज (आदर्श सेवा गौरव पुरस्कार) श्रीकांत पाटील (आदर्श सेवा गौरव पुरस्कार), सुनीता पायगुडे (आदर्श सेवा गौरव पुरस्कार) यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लिटमस फाउंडेशन व छत्रपती युवा संघ चे भरत पायगुडे, अमोल परदेशी, अभिलाष मोरे, रोहित माने, अभिलाष कदम, सिद्धेश पांडे, राज राजपूत आदींनी प्रयत्न केले.
![](https://www.smartpunekarnews.com/wp-content/uploads/2023/09/WhatsApp-Image-2023-09-11-at-4.26.43-PM-1024x684.jpeg)