29/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

‘प्रेमाचा रंग’ गाण्यातून रील स्टार वैशाली पाटेकरची सोशल मीडियावर हवा

Share Post

‘प्रेम, विश्वास या मनातल्या भावना व्यक्त करणं अलीकडे किती सोप्पं झालंय ना…’ हे जाणून घेण्यासाठी अतिशय योग्य उदाहरण म्हणून प्रेमाचा रंग हे एक नवं कोर गाणं प्रेमीयुगुलांच्या दिलाचा ठोका चुकवायला सज्ज झाले आहे. एकमेकांच्या प्रेमात बेधुंद झालेल्या या तरुण युवक युवतीच्या प्रेमाची छटा या रोमँटिक गाण्यातून पाहणं रंजक ठरणार आहे. मुलीच्या प्रेमात बेधुंद होऊन तिच्या प्रियकर कसे रमतो आणि प्रेयसी त्याला कस उत्तर देते याचे हुबेहूब वर्णन करणारे ‘प्रेमाचा रंग’ हे रोमँटिक सॉंग प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. ‘ऍक्ट प्लॅनेट टीम’ अंतर्गत हे गाणं असून या गाण्यात अभिनेता अनुराग बेंदले आणि अभिनेत्री वैशाली पाटेकर ही जोडी पाहायला मिळतेय. ”व्हीपी प्रॉडक्शन’, ‘ऍक्ट प्लॅनेट प्रॉडक्शन’ आणि वैशाली पाटेकर निर्मित आणि उज्वला देशपांडे आणि गीता जेटी प्रस्तुत ‘ऍक्ट प्लॅनेट अंतर्गत’ ‘प्रेमाचा रंग’ हे रोमँटिक गाणे रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.

या प्रेमगीतातून अभिनेत्री वैशाली पाटेकर हिचे करावे तितके कौतुक कमीच. रील स्टार म्हणून आपल्या करिअरची जिने सुरुवात केली तिने एक पाऊल पुढे टाकत आता अभिनय क्षेत्र निवडलं आहे. अभिनयापोटी आणि मराठी गाण्यांच्या प्रेमापोटी तिने अभिनय हे क्षेत्र निवडलं खरं मात्र या क्षेत्रात येऊन तिने निर्मितीक्षेत्रातही पाऊल टाकलं आहे. या गाण्यात वैशाली आणि अनुराग यांचा रोमँटिक अंदाज पाहणं रंजक ठरणार आहे. या प्रेमगीताला राजू नदाफ आणि निकिता पाटील या गायकांनी सुमधुर स्वर दिला आहे. तर ऋषिकेश गोळे याने हे गाणं त्याच्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे.

एका रोमांचक प्रेमकथेचा आस्वाद ‘प्रेमाचा रंग’ या गाण्यातून प्रेक्षकांना घेता येणार आहे. या नव्या जोडीचं हे रोमँटिक सॉंग रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेईल यांत शंकाच नाही.