प्रा.डॉ.मंगेश कराडांना जिवनगौरव पुरस्कार
बे व्ह्यू डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल येथे भांडारकर पब्लिकेशन्सतर्फे आयोजित दहाव्या आंतरराष्ट्रीय “समुद्रमंथन’ पुरस्कार सोहळ्यात एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा.डॉ.मंगेश कराड यांना “जिवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याच्यावतीने “एमआयटी एडीटी’ “मिटकॉम व आयसीटी’च्या संचालक प्रा.डॉ.सुनिता मंगेश कराड यांनी हा पुरस्कार स्विकारला.
याप्रसंगी, पश्चिम नेव्हल कमांडचे कमांडिंग इन चीफ ऍडमिरल दिनेश त्रिपाठी, माजी शिपिंग संचालक अमिताभ कुमार, आयएएस अधिकारी संजय भाटिया, भांडारकर प्रकाशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅप्टन विवेक भांडारकर आदी उपस्थित होते.
प्रा.डॉ.कराड यांना हा पुरस्कार एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या “महाराष्ट्र नौदल शिक्षण आणि प्रशिक्षण अकादमी’ (मॅनेट) या संस्थेच्या मरिन इंजिनिअरींग क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल देण्यात आला आहे. “मॅनेट’ ही सागरी तंत्रशिक्षण(मर्चेंट नेव्ही) क्षेत्रातील कौशल्य संस्था असून गेल्या 23 वर्षांपासून या क्षेत्रात अभिमानास्पद कार्य करत आहे. “मॅनेट’चे 4 हजारांहून माजी विद्यार्थी मर्चेंट नेव्ही क्षेत्रात विविध अधिकारी पदांवर कार्यरत आहेत. या पुरस्कारासाठी “मॅनेट’ची 100 टक्के प्लेसमेंटची हमी, शिप-इन-कॅम्पसची (एसआयसी) स्थापना करणारी आशियातील पहिली संस्था ही ओळख, कॅम्पसमधील ऑलिम्पिक आकाराचा जलतरण तलाव व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या अन्य जागतिक दर्जाच्या सुविधा यांचा विचार करण्यात आला.