NEWS

प्राण्यांना दत्तक घेण्यासाठी ‘पेटगाला पेट शो’ला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Share Post

प्राणी मात्रांवरील क्रूरतेला आळा घालण्यासाठी प्राण्यांविषयी संवेदनशीलता आणि आपुलकीची भावना जागृत करण्यासाठी पेटगाला हा पेट शो पुणे येथे नुकताच संपन्न झाला. पेटगाला पेट शो अंतर्गत आणि MARS Petcare द्वारे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात दत्तक मोहिमेचा समावेश ही कार्यक्रमाची उजवी बाजू ठरली. या मोहिमेचा उद्देश म्हणजे शक्य तितक्या जास्त मांजरी आणि कुत्र्यांना अशा घरामध्ये प्रदान करायचे जिथे त्यांची विशेष काळजी आणि निगा राखली जाईल, हा उच्च उद्देश उराशी बाळगून हा कार्यक्रम रेखाटला गेला. आणि बऱ्याच पुणेकरांनी मांजरी आणि कुत्र्यांना दत्तक घेऊन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. येत्या रविवारी पुणे येथे या सर्वात भव्य दिव्य पाळीव प्राणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

पेटगाला हा पाळीव प्राणी प्रेमींचा एक आकर्षक मेळावा असून या कार्यक्रमात पाळीव प्राण्यांचा आनंद साजरा करण्याची एक खास संधी प्रत्येकाला दिली जाते.


फेलाइन क्लब ऑफ इंडिया (FCI) Whiskas- MARS Petcare या ब्रँडचे, पाळीव प्राण्यांचे अन्न आणि पोषण यामधील प्रमुख, संयुक्त विद्यमाने चार आंतरराष्ट्रीय परीक्षक यांनी कार्यक्रमाचा निकाल जाहीर केला. श्री. अॅलन रेमंड (ऑस्ट्रेलिया), श्रीमती जॅन रॉजर्स (यूएसए), मिस्टर फडली फुआद (इंडोनेशिया), मिस्टर इंद्रा लुबिस (इंडोनेशिया) यांनी या शोमध्ये चॅम्पियनशिप कॅट शोचे परीक्षण केले आहे. या कार्यक्रमात 200 हून अधिक मांजरींचा सहभाग असल्याची माहिती FCI चे अध्यक्ष श्री. साकिब पठाण यांनी दिली. पर्शियन, मेन कून, बंगाल आणि आमची स्वतःची इंडीमाऊ यांसारख्या विविध जाती कार्यक्रमादरम्यान उपस्थित होत्या.

इव्हेंटमध्ये पाळीव प्राण्यांच्या मनोरंजनासाठी काही खास मज्जा मस्ती ही अनुभवायला मिळाली. या कार्यक्रमाचा आस्वाद लुटण्यासाठी प्रत्येक प्राणिप्रेमीने आपल्या पाळीव प्राण्यांसह या कार्यक्रमाला हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *