प्राण्यांना दत्तक घेण्यासाठी ‘पेटगाला पेट शो, पुणे’ ठरणार प्राणीपेमींमधील दुवा
सर्व सृष्टीवर प्रेम करा’ हे भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारे सांगितले आहे. जगात अनेक ठिकाणी प्राणिमात्रांना क्रूरपणे वागवले जाते किंवा त्यांच्याकडे दुर्लक्षच केले जाते. तर याच क्रूरतेला आळा घालण्यासाठी प्राण्यांविषयी संवेदनशीलता आणि आपुलकीची भावना जागृत करण्यासाठी पेटगाला हा पेट शो सदैव तत्पर असतो. पेटगाला पेट शो अंतर्गत आणि MARS Petcare द्वारे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची उजवी बाजू म्हणजे दत्तक मोहिमेचा समावेश, या मोहिमेचा उद्देश म्हणजे शक्य तितक्या जास्त मांजरी आणि कुत्र्यांना अशा घरामध्ये प्रदान करायचे जिथे त्यांची विशेष काळजी आणि निगा राखली जाईल, हा उच्च उद्देश उराशी बाळगून हा कार्यक्रम रेखाटला जातो. इच्छुक सदस्य नक्कीच या कार्यक्रमाला विनामूल्य येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवू शकतात. येत्या रविवारी पुणे येथे हा सर्वात भव्य दिव्य पाळीव प्राणी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
पेटगाला हा पाळीव प्राणी प्रेमींचा एक आकर्षक मेळावा आहे. या कार्यक्रमात पाळीव प्राण्यांचा आनंद साजरा करण्याची एक खास संधी प्रत्येकाला दिली जाईल. हा कार्यक्रम १३ नोव्हेंबर रोजी डेक्कन कॉलेज ग्राऊंडवर सकाळी १० पासून सुरू होणार आहे.
फेलाइन क्लब ऑफ इंडिया (FCI) Whiskas- MARS Petcare या ब्रँडचे, पाळीव प्राण्यांचे अन्न आणि पोषण यामधील प्रमुख, संयुक्त विद्यमाने चार आंतरराष्ट्रीय परीक्षक या कार्यक्रमाचा निकाल जाहीर करतील. श्री. अॅलन रेमंड (ऑस्ट्रेलिया), श्रीमती जॅन रॉजर्स (यूएसए), मिस्टर फडली फुआद (इंडोनेशिया), मिस्टर इंद्रा लुबिस (इंडोनेशिया) हे या शोमध्ये चॅम्पियनशिप कॅट शोचे परीक्षण करणार आहेत. 200 हून अधिक मांजरींचा सहभाग असल्याची माहिती FCI चे अध्यक्ष श्री. साकिब पठाण यांनी दिली. पर्शियन, मेन कून, बंगाल आणि आमची स्वतःची इंडीमाऊ यांसारख्या विविध जाती कार्यक्रमादरम्यान उपस्थित असतील.
इव्हेंटमध्ये पाळीव प्राण्यांच्या मनोरंजनासाठी काही खास मज्जा मस्ती ही अनुभवायला मिळणार आहे, जसे की डॉग रनिंग गेम्स, पूल पार्टी, पेट फॅशन शो, इतर खेळ इत्यादी उपक्रम राबविण्यात येतील. या कार्यक्रमाचा आस्वाद लुटण्यासाठी प्रत्येक प्राणिप्रेमीने आपल्या पाळीव प्राण्यांसह या कार्यक्रमाला हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती.