23/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

प्रतीक अमर दांगट या विद्यार्थ्याने वाढदिवसानिमित्त घेतले अंध विद्यार्थिनीचे शैक्षणिक पालकत्व

Share Post

महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा वाढदिवस म्हटलं की मित्रांबरोबर पार्टी, मजा मस्ती हे समीकरण बनले आहे. मात्र प्रतीक अमर दांगट या विद्यार्थ्याने आपल्या वाढदिवसानिमित्त या सर्व गोष्टींना बाजूला सारत एक आगळावेगळा निर्णय घेत महात्मा गांधी वसाहत, पाटील इस्टेट झोपडपट्टी समोर रहिवासी असलेल्या एका अंध महाविद्यालयीन मुलीचे एक वर्षाचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. प्रतीक सुद्धा एका महाविद्यालयात शिक्षण घेत असून त्याने आपल्या साठवलेल्या पैशातून गरवारे महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकणाऱ्या या गरीब कुटुंबातील  एका अंध मुलीचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. याविषयी बोलताना प्रतीक अमर दांगट म्हणाला, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मी हा निर्णय घेतला आहे, तर विद्यार्थिनीने मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.याप्रसंगी अभिषेक गौड,सागरराज बोदगिरे, समीर देसाई,ऍड स्वप्नील जोशी,सागर माने,सहा.पो. फौजदार नवनाथ अडसूळ, कार्तिक थोटे उपस्थित होते.