23/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

प्रणव रावराणे झळकणार ‘गुगल आई’ चित्रपटात

Share Post

सध्या दाक्षिणात्य चित्रपटांना पॅन इंडिया ओळख मिळाली आहे. दाक्षिणात्य चित्रपट बॉलीवूडला टक्कर देत असले तरी मराठी चित्रपट कंटेंट च्या जोरावर आपले वेगळेपण टिकवून आहेत.  मराठी चित्रपटांचे हेच वेगळेपण लक्षात घेऊन पहिल्यांदाच दाक्षिणात्य निर्मिती संस्था, निर्माते आणि दिग्दर्शक एक हटके मराठी चित्रपट घेऊन येत आहेत.  ‘गुगल आई’  असे या चित्रपटाचे नाव असून यामध्ये अभिनेता प्रणव रावराणे चित्रपटात बघायला मिळणार आहे. 

आंध्र प्रदेश येथील प्रथितयश निर्माते सी दिवाकर रेड्डी हे आपल्या डॉलर्स मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि या संस्थेच्या माध्यमातून गुगल आई ची निर्मिती करत आहेत. तर गोविंद वराह यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तेलगू , तामिळ आणि कन्नड भाषेतील चित्रपट त्यांनी यापूर्वी दिग्दर्शित केले आहेत.  

माय लेकीच्या नात्याचा आणि आई मुलीच्या गोडव्या चा वेगळा प्रवास ‘गूगल आई’ ह्या हटके टायटल असलेल्या चित्रपटांमधून पाहायला मिळणार आहे.  या चित्रपटाची कथा व पटकथा गोविंद वराह यांचीच असून अमित नंदकुमार बेंद्रे ह्यांनी संवाद लिहिले आहेत. चित्रपटाचे कार्यकारी निर्माते सचिन अशोक वाडकर आहेत तर असोसिएट दिग्दर्शक म्हणून अर्जुन भोसले हे काम पहात आहेत, चित्रपटात चार श्रवणीय गाणी असून ती गाणी संगीतबध्द करण्याची उत्तम कामगिरी सागर शिंदे ह्यांनी पार पाडली आहे.ह्या चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शन मयूर आडागळे हे करणार आहेत.

चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक गोविंद वराह म्हणाले की, अनेक सिनेमा मधून आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिकणार प्रवण रावराणे प्रमुख भूमिकेत असून ह्या चित्रपट प्रणव ने आता पर्यंत केलेल्या कामांपेक्षा वेगळा असेल.तसेच  ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर, अश्विनी कुलकर्णी यांच्या  महत्वपूर्ण भूमिका आहेत.  चित्रपटाचे चित्रीकरण महाराष्ट्रासह हैद्राबाद, सिकंदराबाद व आसपासच्या भव्य लोकेशन वर होणार असल्याचे गोविंद वराह ह्यांनी सांगितले.  

निर्माते सी दिवाकर रेड्डी म्हणाले, मराठी माणसे पहिल्या पासून मदतीला धावून येण्यास तत्पर असतात हा आमचा पहिलाच प्रयत्न आहे.  ह्याला ही रसिकांनी अशीच भरभरून दाद द्यावी ही गणपती बाप्पा आणि व्यंकटेश भगवान चरणी प्रार्थना.

याप्रसंगी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले म्हणाले असे वेगवेगळे भाषिक निर्माते दिग्दर्शक मराठी कडे आकर्षित होत आहेत.ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे.यामुळे मराठी चित्रपट सृष्टीमध्ये चांगली चांगली निर्मिती होईल. उत्तर भाषिक चित्रपटा प्रमाणे वेगळे दर्जेचे चित्रपट या माध्यमातून येतील.कलाकार तंत्रज्ञ यांना काम मिळेल आणि अशा निर्मात्यांचे दिग्दर्शकांचे मराठी चित्रपट सृष्टीत स्वागत आहे. आणि चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या.