23/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

प्रख्यात तालवादक शिवमणी यांच्या तालवादनाने सजला
हर हर महादेव चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा!

Share Post

झी स्टुडियोजच्या आगामी ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. छत्रपती शिवाजी
महाराजांचा गौरवशाली इतिहास तेवढ्याच भव्य दिव्य पद्धतीने या चित्रपटाद्‌वोरे प्रेक्षकांच्या भेटीस येणार
आहे. “हर हर महादेव’ सर्वार्थाने मराठीत भव्यतेचा एक नवा पायंडा पाडणारा चित्रपट ठरणार आहे.
त्यामुळे या लौकिकाला साजेसा असाच या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळाही मोठ्या दिमाखदार
पद्धतीने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरलं आंतरराष्ट्रीय
ख्यातीचे तालवादक शिवमणी यांचं ताल्रवाद्यांचं सादरीकरण. दमडीवर ताल धरत रंगमंचावर
अवतरलेल्या शिवमणी यांनी पुढचे काही मिनिटे ड्रम्स, तबला, ढोल आणि इतर वाद्यांच्या वादनाची
अशी काही मैफल रंगवली की उपस्थित प्रत्येक प्रेक्षक त्या नादाने भारावून गेला. या चित्रपटाच्या
निमित्ताने शिवमणी पहिल्यांदाच मराठी चित्रपटातील गाण्यासाठी तालवादन करणार आहेत हे विशेष.

हर हर महादेव’ या चित्रपटाला हितेश मोडक यांचं संगीत असून यातील यातील “बाजी रं बाजी रं
झुंजार बाजी रं’ हे गाणं गीतकार मंदार चोळकरने लिहिलं असून ते मनिष राजगिरेने गायलं आहे.
तर शीर्षक गीत “हर हर महादेव” हे मंगेश कांगणेने ल्लिहिलं असून ते गाणं सुप्रसिद्ध गायक शंकर
महादेवन यांनी गायलं आहे. हे गाणं तालवादक शिवमणी यांच्या तालवादनाने सजलं आहे. याशिवाय
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील गायनाच्या दुनियेतला आजच्या घडीचा लखलखता तारा सिद श्रीराम
या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटात गाणं गात आहे. हर हर महादेवमधील “वाह
रे वाह शिवा” हे गाणं त्याने गायलं असून या गाण्याचे शब्द आहेत मंगेश कांगणे यांचे. या तीनही
गाण्यांविषयी बोलताना संगीतकार हितेश मोडक म्हणाले की,”अशा प्रकारच्या भव्य दिव्य ऐतिहासिक
चित्रपटाला आधूनिक वाद्यांचा वापर करून संगीत देणं हे खरंच खूप आव्हानात्मक काम होतं.

“हर हर महादेव” या चित्रपटात सुबोध भावे आणि शरद केळकर यांच्यासह अभिनेत्री अमृता
खानविलकरही एका विशेष भूमिकेत दिसणार आहे. सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग एन्ड
फिल्म्स तसेच झी स्ट्ुडियोजची निर्मिती असलेला हा चित्रपट २५ ऑक्टोबरला भारतभरात प्रदर्शित
होणार आहे.