17/07/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

पोषाखकलेतील संदेशची भरारी

Share Post

भारतात फॅशन म्हणजे उच्चभ्रूंचा छंद आणि हौस एवढीच मर्यादित व्याख्या होती मात्र आता फॅशनचा उद्योग म्हणून जन्म झाला आहे असे म्हणायला वावगं ठरणार नाही. फॅशनच्या या उद्योगाला जाग केलंय ते कलाविश्वाने. आज कलाविश्वात वेषभूषाकारांनी खऱ्या अर्थाने ही फॅशन जोपासली आहे. अशाच हिंदी आणि मराठी कलाविश्वात यशस्वी वेशभूषाकार म्हणून संदेश नवलखा याने उत्तम बाजी मारली आहे.

मूळचा पुण्याचा असलेल्या संदेशची फॅशन डिझायनर या क्षेत्रात येणं ही आवड होती. मारवाडी कुटुंबात लहानच मोठं झालेल्या संदेशला वडिलोपार्जित चालत आलेल्या ट्रॅडिशनल व्यवसायात काहीच रस नव्हता. आपली आवड जोपासण्यासाठी त्याने फॅशन डिझायनिंग करण्याचे ठरविले. आई वडिलांच्या आणि पत्नीच्या पाठिंब्यामुळे त्याने कलाविश्वात फॅशन डिझायनर म्हणून उडी घेतली. २००७ सालापासून तो या क्षेत्रात कार्यरत आहेत.

Smirnoff International Fashion Award’ या जगभरातल्या फॅशन इंडस्ट्रीतील नावाजलेल्या अवॉर्ड शोमध्ये संदेश सेमी फायनॅलिस्ट पर्यंत पोहचला, तर ‘Surydatta Natioanl Award’ मध्ये संदेशचा विशेष सन्मान करून त्याला सन्मानित करण्यात आले. शिवाय झी अवॉर्डने ही त्याला सन्मानित करण्यात आले आहे. स्टायलिंग आणि फॅशनचे धडे देण्यात संदेश पटाईत आहे, मुंबई पुण्यातल्या काही फॅशन इन्स्टिस्ट्युटमध्ये संदेश कर्ताधर्ता म्हणून काम पाहत आहे.